Gas Cylinder: गॅस नियमांत मोठे बदल; पुण्यातील 'या' ग्राहकांना आता मिळणार नाही गॅस सिंलिंडर

पुणे: तुम्ही जर घरगुती गॅस सिलिंडर वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आतापासून KYC (केवायसी) प्रक्रिया पूर्ण नसलेल्या ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय गॅस कंपन्यांनी घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी आता अनेक ठिकाणी सुरू झाली असून, केवायसी नसल्यास तुमचे गॅस बुकिंग ऑनलाइन स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणं बंधनकारक आहे.


केवायसीसोबतच गॅस वितरणाबाबत आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. आता दोन सिलिंडर बुक करण्यामधील कालावधी २१ दिवसांवरून थेट ३० दिवसांपर्यंत वाढवण्यात आला आहे. म्हणजेच, एकदा सिलिंडर घेतल्यानंतर आता तुम्हाला पुढील बुकिंगसाठी किमान ३० दिवस वाट पाहावी लागणार आहे. या नियमामुळे ग्राहकांच्या प्रतीक्षा कालावधीत आठ दिवसांची वाढ झाली असून, याचा थेट परिणाम गॅसच्या उपलब्धतेवर होणार आहे.


आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर मोठा ताण आला आहे. कच्च्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्यातील अनिश्चिततेमुळे एलपीजी सिलिंडरच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वितरकांनी स्पष्ट केले आहे की, प्रलंबित केवायसी आणि वाढती मागणी यामुळे वितरण व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.


नागरिकांनी गॅसचा वापर काटकसरीने करावा आणि आपल्या जवळच्या वितरकाकडे जाऊन तातडीने केवायसी अपडेट करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा, गॅस बुकिंगमध्ये तुम्हालाही मोठा मनस्ताप सहन करावा लागू शकतो.

Comments
Add Comment

Congress: काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर

मुंबई: अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत अखेर राजकीय

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश

U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात! - ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक