Samantha Ruth Prabhu : समंथा रुथ प्रभू प्रेग्नंट? व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण

दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) पुन्हा एकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनंतर (Video) अभिनेत्री प्रेग्नंट (Pregnant) असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, याबाबत समंथा किंवा तिच्या जवळच्या व्यक्तींनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.


समंथाचा ‘मां इंति बंगाराम’ (Maa inti bangaram movie ) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या यशानिमित्त आयोजित कार्यक्रमात समंथा आणि राज निदिमोरु एकत्र दिसले. या कार्यक्रमातील अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. (Samantha Ruth Prabhu Viral)



व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत 


व्हिडीओमध्ये समंथा साध्या आणि कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. तिने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली होती. याच व्हिडीओतील काही दृश्यांवरून काही सोशल मीडिया युजर्सनी अभिनेत्री प्रेग्नंट (Pregnant) असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.


तथापि, समंथा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा आणि दाव्यांकडे सावधपणे पाहण्याची गरज आहे. अनेकदा व्हिडीओ किंवा फोटोच्या आधारे अशा अफवा पसरत असल्याचेही पाहायला मिळते.



दरम्यान, समंथा तिच्या आगामी प्रकल्पांमुळेही चर्चेत आहे. अभिनेत्रीने गेल्या काही वर्षांत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत चाहत्यांमध्ये नेहमीच उत्सुकता असते.


सध्या सोशल मीडियावर समंथाच्या प्रेग्नन्सीबाबत विविध चर्चा रंगल्या असल्या तरी अभिनेत्री किंवा तिच्या टीमकडून अधिकृत माहिती समोर येईपर्यंत या केवळ अफवा मानल्या जात आहेत.




 
Comments
Add Comment

Arjun Rampal : ८ वर्षांच्या सहवासानंतर अखेर जोडले बंध; अभिनेता अर्जुन रामपालने गोव्यात गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत उरकले लग्न!

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची दीर्घकाळाची जोडीदार गॅब्रिएला डेमेट्रियाडेस यांनी अखेर अधिकृतपणे

Taapsee Pannu : तापसी पन्नूच्या 'गांधारी' चित्रपटाची पहिली झलक समोर; टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट 'गांधारी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचे दिग्दर्शन

Sandeep Vanga vs Deepika Padukone : दीपिका पादुकोणमुळे ‘स्पिरीट’ची कथा फुटली ? ५-६ कोटींचा वाद अन् १०% चा वाटा; वांगा बंधूंचा दीपिका पादुकोणवर सनसनाटी आरोप

मुंबई : दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांच्या आगामी ‘स्पिरीट’ (Spirit Movie) या बहुचर्चित चित्रपटाभोवतीचा वाद

Vanita Kharat : सावध राहा! ऑनलाईन पार्सलच्या जाळ्यात अडकली वनिता खरात; अभिनेत्रीनेच उघड केली भामट्यांची नवी शक्कल!

मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातसोबत पार्सलच्या नावाने ऑनलाइन फसवणुकीचा प्रकार

Akshaye Khanna : धुरंधरचा 'रहमान डकैत' आता गुरु शुक्राचार्यांच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना त्याच्या नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांसाठी चर्चेत आला. 'छावा'मधील 'औरंगजेब'

Sonu Nigam : "ते १२ रुपये फ्रेम करून मी आजही माझ्या ऑफिसमध्ये लावले आहेत", सोनू निगमने सांगितला जबरदस्त किस्सा

मुंबई : अनेक कलाकार बरेचदा आपल्या चाहत्यांचं प्रेम जाणून घेण्यासाठी वेशांतर करुन त्यांच्यात वावरतात. २०१६ मध्ये