Pandarpur Mandir : पंढरपूर मंदिरातील लेपन प्रक्रियेवरील स्थगिती अर्ज न्यायालयाने नाकारला

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्यानुसार करण्यात येणाऱ्या लेपन प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी याचिका जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ही याचिका भीमाचार्य बाळाचार्य वरखेडकर यांनी दाखल केली होती.



दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने स्थगिती अर्ज नामंजूर केला. दरम्यान, मंदिर महासंघाचे गणेश लंके यांनी दाखल केलेल्या स्वतंत्र अर्जावर रविवारी (२२ जून) न्यायालय निर्णय देणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. मंदिर समितीनुसार स्वयंभू विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींची झीज होत असल्याने त्यांचे जतन आणि संवर्धन करण्याचा सल्ला भारतीय पुरातत्त्व विभागाने दिला आहे. त्यानुसार २२ ते २४ जून या कालावधीत पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मूर्तींवर लेपन प्रक्रिया करण्यात येणार आहे. या कामासाठी २२ आणि २३ जून या दोन दिवसांत मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार असून, संवर्धन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमित दर्शन व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.
Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रात टाटा स्ट्राइव्हच्या माध्यमातून कौशल्य विकासाला चालना मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हज ट्रस्टच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या टाटा स्ट्राइव्हने महाराष्ट्रातील

Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्डे बुजवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर; प्री-कास्ट पॅचने दुरुस्तीला सुरुवात

पुणे : चाकण औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या समस्येवर आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने

Ahilyanagar Crime : गौण खनिज माफियांवर कारवाईचा हातोडा, अहिल्यानगरमधील ६३ क्रशर सील

Ahilyanagar Crime : अहिल्यानगर तालुक्यातील खडीकरण केंद्रांवर महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील सर्व ६३

Pune RTO : पुणेकरांसाठी मोठी बातमी! ‘MH 12’ ची जागा आता ‘MH 61’ घेणार? वाहनांच्या नंबरबाबत मोठा बदल

पुणे : पुणेकरांची खास ओळख बनलेली ‘MH 12’ वाहन क्रमांक मालिका आता लवकरच संपण्याची शक्यता आहे. पुण्यात वाहनांची

Chhatrapati Sambhajinagar Suicide : 'तुला Iphone 15 Pro देतो, खाली ये बाळा'... डोंगराच्या कड्यावरून आई-वडिलांची आर्त हाक

डोंगरावर गेला, 3 तास कड्यावर उभा राहिला; उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही अंत छत्रपती संभाजीनगर :

Maharashtra Weather Alert : श्रावणसरी गायब! महाराष्ट्रावर पावसाचे संकट; पुढील काही दिवस कोरड्या हवामानाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट महिन्याचा अर्ध्याहून अधिक कालावधी संपला असतानाही महाराष्ट्रातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक