देशात पेट्रोल-डिझेलची कमतरता नाही, भारताकडे ४ हजार कोटी लिटर तेल; आठ आठवडे इतका पुरेसा साठा

नवी दिल्ली : अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धादरम्यान भारताला कच्च्या तेलाची कमतरता भासणार नाही. भारताकडे सध्या कच्च्या तेलाचा आणि रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांचा २५ कोटी बॅरल (सुमारे ४ हजार कोटी लिटर) पेक्षा जास्त साठा आहे.सरकारच्या अहवालानुसार, हा बॅकअप इतका आहे की, जर पुरवठा पूर्णपणे थांबला तरी, देशाची संपूर्ण पुरवठा साखळी ७ ते ८ आठवडे सहज चालू शकते. म्हणजेच, येत्या काळात पेट्रोल-डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या कमतरतेची कोणतीही चिंता नाही.


भारताकडे केवळ २५ दिवसांचा साठा शिल्लक आहे,असा माध्यमातून केलेला दावा केंद्र सरकारने फेटाळून लावला आहे. भारताची ऊर्जा सुरक्षा आता कोणत्याही एका मार्गावर किंवा देशावर अवलंबून नाही. भारताची ऊर्जा खरेदी पूर्णपणे 'राष्ट्रहिता'वर आधारित आहे. गेल्या १० वर्षांत भारताने आपल्या तेल खरेदीचा आवाका लक्षणीयरीत्या वाढवला आहे. एक दशकापूर्वी भारत केवळ २७ देशांकडून तेल खरेदी करत होता, जी संख्या आता ४० झाली आहे. जागतिक स्तरावरील तणावामुळेही भारताने आपल्या गरजांसाठी नवीन मार्ग शोधले आहेत.


जगातील सर्वात संवेदनशील सागरी मार्गांपैकी एक असलेल्या 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'बद्दल अनेकदा चिंता व्यक्त केली जाते, परंतु भारताने आपली रणनीती बदलली आहे. आता भारताचे केवळ ४० टक्के कच्चे तेल या मार्गाने येते.उर्वरित ६० टक्के तेल रशिया, पश्चिम आफ्रिका, अमेरिका आणि मध्य आशियासारख्या पर्यायी मार्गांनी येते. अहवालानुसार,भारताची ऊर्जा सुरक्षा एकाच सागरी मार्गावर अवलंबून होती, ते दिवस आता राहिले नाहीत.


सरकार परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम: मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती : इराण विरुद्ध इस्त्रायल-अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही. त्यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठ्या रांगा लागल्या आहेत, असे ते म्हणाले. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार भविष्यातील स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले, लोकांना चुकीची माहिती देऊन पॅनिक तयार करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने यासंदर्भातील आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशाप्रकारे पाऊले उचलली हे आपल्यासमोर आले आहे. सध्या राज्यात कुठेही इंधन टंचाई नाही. काही माध्यमांनी दोन-तीन दिवस झाले पेट्रोल - डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या बातम्या दिल्या. यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठमोठ्या रांगा लागल्या. असा कोणताही तुटवडा नाही. केंद्र सरकारनेही हे स्पष्ट केले आहे. भविष्यात जी परिस्थिती उद्भवेल, त्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार मोदींच्या नेतृत्वा सक्षमपणे भक्कम परिस्थितीत आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेचा विशेष ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर अर्थात मेन लाईनवर परळ आणि करी रोड स्थानकांदरम्यानच्या प्रभादेवीवरील

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग

Bhoot Bangla :अक्षय कुमार आणि एकता कपूरचा मोठा डाव! लवकरच बहुप्रतिक्षित ‘भूत बंगला’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार

मुंबई : ‘भूत बंगला’ (Bhoot Bangla) सिनेमाबाबतची उत्सुकता सातत्यानं वाढत आहे. याच्या रोचक झलक आणि गाजलेल्या गाण्यांनी आधीच

Hrithik Roshan Divorce : 'या' कारणामुळे हृतिक आणि सुझाननं घेतला घटस्फोट, अभिनेता जायेद खाननं केला खुलासा

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) नुकताच पुतण्याचा लग्नातील डानसमुळे चर्चेत आला होता. हृतिक

Sourav Ganguly Biopic : लवकरच 'सौरव गांगुली'चा बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार, मुख्य भूमिकेत झळकणार 'हा' अभिनेता

मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू सौरव गांगुलीच्या जीवनावर आधारित ‘दादा’ या बहुप्रतीक्षित

Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रे अडचणीत, पुण्यातील मावळच्या शेतकऱ्यानं केले गंभीर आरोप

मुंबई : अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे (sonali Bendre) आणि तिचे