Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात भीषण अपघात; फॉर्च्युनरचा अक्षरशः चुराडा, एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या फॉर्च्युनर कारने पुढे जाणाऱ्या मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. कारमधील अन्य तीन प्रवासी किरकोळ जखमी होऊन बचावले. ( Mumbai Pune Expressway)


प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त फॉर्च्युनरमधील पाचही प्रवासी पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरातील रहिवासी आहेत. ते पुण्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना मिसिंग लिंक बोगद्यात हा अपघात झाला. वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कारने समोरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Missing Link)



धडक इतकी जोरदार होती की फॉर्च्युनरचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर दोन्ही वाहने रस्त्यावर अडथळा बनून उभी राहिल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे बंद करण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनांना जुन्या मुंबई-पुणे मार्गावरून वळवण्यात आले. (Road Accident)


घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला. (Pune News)


या अपघातामुळे मिसिंग लिंक परिसरात सुमारे 2 ते 3 तास वाहतुकीचा खोळंबा झाला. वाहने हटवल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर मुंबईच्या दिशेने वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. (Accident)


या प्रकरणी महामार्ग पोलीस पुढील तपास करत असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. (Accident News)

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

Pro Govinda Season 4 : प्रो गोविंदा सीझन ४ चा थरार रंगला; विजेत्यांवर बक्षिसांची लयलूट, दहीहंडी ऑलिम्पिकपर्यंत नेण्याचा निर्धार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव यांच्या हस्ते

Eknath Shinde : नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी महाराष्ट्र सरकार सक्रिय

मुंबई : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील

CM Devendra Fadnavis : औंढा नागनाथ मंदिराच्या विकासाला १९३ कोटींची मंजुरी

मुंबई : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या औंढा नागनाथ (Aundha Nagnath) मंदिराच्या प्राचीन शिल्पकलेचे जतन करताना

Dada Bhuse : शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! पवित्र पोर्टलद्वारे १३ हजार ११९ पदांसाठी उमेदवारांची शिफारस

मुंबई : राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, पवित्र पोर्टलमार्फत १३ हजार ११९ शिक्षक पदांसाठी

CM Devendra Fadnavis : पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊनच अंतिम करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा वारकरी, भाविक, स्थानिक नागरिक, व्यापारी, मठाधिपती आणि