भटक्या श्वानांच्या नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील भटक्या श्वानांचे नियंत्रण, निर्बीजीकरण, रेबीज प्रतिबंधक लसीकरण यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. असे असले तरी या उपाययोजनांना गती देण्यासाठी, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी क्षमता वाढविणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर, नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढवणे, प्राणी निवारा केंद्रांची निर्मिती करणे, सर्व प्रशासकीय प्रभागनिहाय श्वान पकडणारी वाहने आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देणे इत्यादी उपाययोजना राबविण्यात याव्यात. एकूणच प्राणी व्यवस्थापन अधिक शास्त्रीय आणि मानवीय पद्धतीने करण्यात यावे, अशी सूचना मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली आहे.


यासंदर्भात महापौर रितू तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईमध्ये भटक्या श्वानांची संख्या मागील काही वर्षांत लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे आढळून आले आहे. विविध प्रभागांमध्ये श्वानांनी चावा घेतल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हा विषय सार्वजनिक आरोग्य, नागरिकांची सुरक्षितता आणि नागरी व्यवस्थापन या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.


महानगरपालिकेकडून प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असला तरी विद्यमान पायाभूत सुविधा आणि उपलब्ध क्षमता ही मुंबईतील श्वानांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत अपुरी ठरत आहे. सध्या मुंबईत सुमारे ८ अशासकीय संस्थामार्फत नसबंदीकरण व लसीकरणाची कामे केली जातात. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २६ प्रशासकीय प्रभागांमध्ये भटक्या श्वान संख्येवर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी या क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ करणे आवश्यक आहे. यादृष्टीने पुढील काही उपाययोजना सुचवित आहे.


नसबंदीकरण केंद्रांची क्षमता वाढविणे - सध्या कार्यरत असलेल्या ८ अशासकीय प्राणीप्रेमी संस्थांव्यतिरिक्त मुंबईच्या विविध भागांमध्ये नवीन नसबंदीकरण केंद्रे स्थापन करणे आवश्यक आहे. यामुळे श्वानांच्या नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची क्षमता वाढेल. तसेच श्वानांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असलेले वार्षिक लक्ष्य साध्य करता येईल.


अशा प्रकारे सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळविता येईल, श्वान चावण्याच्या घटनांमध्ये घट होवू शकते आणि नागरिकांच्या सुरक्षिततेत वाढ करता येईल. समवेत, नागरी प्राणी व्यवस्थापन अधिक शास्त्रीय आणि मानवीय पद्धतीने राबविता येईल. त्यामुळे सदर विषयाचा प्राधान्याने विचार करून आवश्यक प्रशासकीय मान्यता व अंमलबजावणीबाबत कृपया पुढील कार्यवाही करण्यात यावी, असे महापौर रितू तावडे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

Law Admission Update : 16 कॉलेजांना 100% प्रवेशाची परवानगी; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या विधि प्रवेश (Law Admission 2026) प्रक्रियेची प्रतीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक

Central Railway Mega Block : शीव आरओबीच्या कामासाठी माटुंगा-कुर्ला दरम्यान विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक; लोकल व एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मि

Amit Shah : देशातील नागरी सहकारी बँकाचे मुख्यालय मुंबईत; केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची घोषणा

दिल्लीहून मुंबईत कार्यालयाचे स्थलांतर होणार https://prahaar.in/2026/08/08/jalgaon-accident-news-four-people-narrowly-escaped-an-accident/ मुंबई : देशातील नागरी सहकारी

Devendra Fadnavis : सिद्धिविनायक मंदिरातील देणगी घोटाळ्याची चौकशी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

पाच वर्षांतील देणगी आणि दान संकलनाची तसापणी

Mumbai Metro Good News : मुंबईकरांना मोठा दिलासा! अंधेरी-घाटकोपर मार्गावर १० ऑगस्टपासून 'मिक्स्ड-लूप' सेवा; गर्दीच्या वेळी ३ मिनिटांत मेट्रो!

मुंबईतील सर्वात वर्दळीच्या वर्सोवा–अंधेरी–घाटकोपर (मेट्रो १) (Andheri to Ghatkopar Metro 1) मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो

IIT Bombay Hostel Canteen : आयआयटी बॉम्बेच्या 2 हॉस्टेल मेसला टाळं! FDAची मोठी कारवाई; मुंबईतील 4 खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खाद्य आस्थापनांविरोधात महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA)