मार्को जेन्सनच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिका सुस्थितीत

कोलकाता : न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टी-२० उपांत्य फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची कामगिरी घसरली. शेवटच्या षटकांमध्ये मार्को जेन्सन याने ३० चेंडूमध्ये ५५ धावांची आक्रमक खेळी केल्याने दक्षिण आफ्रिकेला २० षटकांमध्ये ८ बाद १६९ ही समाधानकारक धावसंख्या उभारता आली.


सलामीवीर कर्णधार एडन मार्क्रम अवघ्या २० चेंडूत १८ धावा काढून बाद झाला. दुसरा सलामीवीर यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक हा अवघ्या १० धावांवर बाद झाला. रायन रिकेल्टनला खातेही उघडता आले. कोल मॅकॉन्चीने त्याला शून्यावर बाद केले. डेवाल्ड ब्रेव्हिसने ३ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३४ धावा करताना धावफलक हलता ठेवला. भरवशाचा खेळाडू डेव्हिड मिलरदेखील अवघ्या ६ धावांवर बाद झाला. ट्रिस्टन स्टब्सने २४ चेंडूत एक षटकार व दोन चौकार मारत २९ धावा करत धावगतीला आकार दिला. त्यानंतर आलेल्या मार्को जेन्सने नाबाद अर्धशतकी खेळी केली. अवघ्या ३० चेंडूंमध्ये तब्बल ५ षटकार व २ चौकार मारत ५५ धावांची खेळी उभारली. कॉर्बिन बॉश हा अवघ्या दोन धावा काढून मॅट हेन्रीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. कागिसो रबाडा हादेखील शून्यावर बाद झाला, तर केशव महाराज एक धावसंख्येवर नाबाद राहीले. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ३४ धावांमध्ये २ बळी तर मिशेल सँटनरने २५ धावांत २ बळी, रॅचिन रवींद्रने २९ धावांत २ बळी घेतले.


कर्णधार एडन मार्करम याचा झेल वादग्रस्त


नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतल्यावर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत दक्षिण आफ्रिकेच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडण्याचा डाव अगदी यशस्वी साधला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याचा झेल वादग्रस्त ठरला आहे.


दक्षिण आफ्रिकेच्या डावाच्या ८ व्या षटकात रचिन रवींद्र गोलंदाजी करत होता. मार्करम याने मारलेला फ्लॅट फटका लॉन्ग-ऑनच्या दिशेने गेला. डॅरिल मिचेल याने अप्रतिमरित्या झेल टिपण्याचा प्रयत्न केला. त्यालाही हा झेल झाला की नाही त्याबाबत शंका होती. पण तिसऱ्या पंचाला तसे वाटले नाही. फार वेळ न घेता तिसऱ्या पंचांनी एडन मार्करम बाद असल्याचा निर्णय दिला. यावरुन सोशल मीडियावर तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर शंका उपस्थितीत करण्यात येत आहेत. तिसऱ्या पंचांनी मार्करमला आउट असल्याचा निर्णय दिल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराची पत्नी निकोल डॅनियलसह तिच्यासोबत असणाऱ्या साऱ्याजणी आवाक झाल्याचे पाहायला मिळाले.


मैदानावरील पंच अॅलेक्स व्हार्फने कॅच दरम्यान चेंडू जमिनीला स्पर्श केला आहे की नाही हे ठरवण्यासाठी तिसरे पंच नितीन मेनन यांची मदत घेतली. सुरुवातीला फ्रंट-अँगल रिप्लेमुळे कॅच संशयास्पद वाटला, ज्यामुळे मिशेलच्या डायव्ह दरम्यान चेंडू कदाचित मैदानावर आदळला असावा असे दिसून आले. तथापि, जेव्हा साईड-ऑन रिप्ले दाखवण्यात आला तेव्हा असे दिसून आले की, मिशेलने चेंडू जमिनीवर येण्यापूर्वीच त्याचे बोटे खाली ठेवण्यात यश मिळवले होते. उपलब्ध अँगल पाहिल्यानंतर, थर्ड अंपायर नितीन मेनन साइड-ऑन पुराव्यांवर समाधानी झाले आणि त्यांनी कॅच क्लीन ठरवला आणि मार्करामला तंबूचा रस्ता धरावा लागला. मार्करम याने २० चेंडूत १८ धावा केल्या. यात त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला.


सेइफर्टचा डोळा थोडक्यात बचावला


आफ्रिकेने पॉवर प्लेमध्ये २ बाद ४८ धावा केल्या. ल्युकी फर्ग्युसनने टाकलेल्या सहाव्या षटकात काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग घडला होता. फर्ग्युसनने उत्तम बाऊन्सर फेकला आणि तो फलंदाज ब्रेव्हिसला मारता नाही आला. चेंडू यष्टिरक्षक टीम सेइफर्टच्या दिशेने गेला अन् तो टिपताना ग्लोव्ह्जला लागून तो सेइफर्टच्या डाव्या डोळ्याच्या बरोबर खाली आदळला. चेंडूचा वेग एवढा होता की सेइफर्ट वेदनेने विव्हळला आणि मैदानावर आडवा झाला. फर्ग्युसनने तातडीने वैद्यकिय मदतीचा इशारा केला. सुदैवाने सेइफर्टला गंभीर दुखापत झाली नाही. प्राथमिक उपचार घेत सेइफर्ट पुन्हा मैदानावर यष्टिरक्षणासाठी उभा राहिला.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

INDvsSL : भारत विरुद्ध श्रीलंका, पहिल्या कसोटी सामन्यात कोण खेळणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. श्रीलंकेत होणार असलेल्या या मालिकेतील

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

UEFA Super Cup 2026 : PSG चा Aston Villa वर 2-1 ने विजय; सलग दुसऱ्यांदा Super Cup वर नाव!

साल्झबर्ग : Paris Saint-Germain (PSG) ने Aston Villa वर 2-1 असा रोमांचक विजय मिळवत 2026 UEFA Super Cup आपल्या नावावर केला. 12 ऑगस्ट 2026 रोजी ऑस्ट्रियातील