मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता महापालिकेच्या वैधानिक समित्या असलेल्या १७ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी बुधवारी ०४ मार्च रोजी उमेदवारी अर्ज संबंधित प्रभागातील सचिवांना सादर केले. या १७ प्रभाग समित्यांपैंकी ११ प्रभाग समित्यांमध्ये बिनविरोध निवडणूक होणार आहे. तर जी उत्तर प्रभाग समितीमध्ये मनसेचे यशवंत किल्लेदार आणि उबाठाचे जोसेफ कोळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असले तरी प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पंधरा मिनिटे यातील एक उमेदवार अर्ज मागे घेणार असल्यामुळे याठिकाणीही बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण १२ प्रभाग समित्यांमध्ये बिनविरोध निवडणूक होणार आहे.



मुंबई महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांच्या निवडणूका तीन टप्प्यात म्हणजे गुरुवारी ५ मार्च, शुक्रवारी ६ मार्च आणि येत्या सोमवारी ९ मार्च रोजी होणार आहेत. या तिन्ही टप्प्यातील निवडणुकांमध्ये महापौर आणि उपमहापौर हे पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज सांभाळणार आहे.



मुंबई महापालिकेच्या पाच समित्यांमध्ये म्हणजे ए,बी अँड ई , एफ दक्षिण व एफ उत्तर , पी पूर्व व पी पश्चिम, एस अँड टी , एम पूर्व या प्रभाग समित्यांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांनी अर्ज भरल्याने याठिकाणी निवडणूक होणार आहे. तर यातील एस अँड टी या प्रभाग समितीमध्ये महायुती आणि विरोधक यांची सदस्य संख्या समसमान असल्यामुळे याठिकाणी ईश्वर चिठ्ठीवर अध्यक्षांची निवड होणार आहे.



येत्या गुरुवारी ०५ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती :


सी अँड डी : भाजप- अकाश पुरोहित,


ए,बी अँड ई : काँग्रेस -ज्ञानराज निकम, भाजप- रोहिदास लोखंडे


एफ दक्षिण व एफ उत्तर : उबाठा- श्रध्दा जाधव, शिवसेना -मानसी सातमकर


आर उत्तर व आर मध्य : भाजप- प्रकाश दरेकर


आर दक्षिण विभाग : भाजप-लिना देहेरकर


पी पूर्व व पी पश्चिम : राष्ट्रवादी काँग्रेस- अजित रावराणे, काँग्रेस- हैदर अली


येत्या शुक्रवारी ०६ मार्च रोजी होणाऱ्या प्रभाग समिती


एच पूर्व व एच पश्चिम : उबाठा- रोहिणी कांबळे,


जी उत्तर : मनसे :यशवंत किल्लेदार, उबाठा- जोसेफ कोळी


जी दक्षिण : उबाठा : पद्मजा चेंबूरकर,


पी दक्षिण : भाजप- श्रीकला पिल्ले


के पश्चिम : भाजप – रोहन राठोड


के -उत्तर व के- दक्षिण : भाजप- प्रकाश मुसळे

Comments
Add Comment

महाराष्ट्रात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा

मुंबई : महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. राज्यात पेट्रोल-डिझेलचा पुरवठा नियमित आहे.

राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी स्वतंत्र 'नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण' स्थापन होणार; मंत्री पंकजा मुंडे यांची विधानसभेत माहिती

मुंबई : राज्यातील नद्यांमधील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आता एक मोठे पाऊल

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा आणि उमरखाडीचा चेहरामोहरा बदलणार; गृहनिर्माण प्रकल्पांना मिळणार वेग

मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कामाठीपुरा आणि उमरखाडी परिसरातील हजारो रहिवाशांचे पुनर्वसनाचे

एसअँडपीने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज ७.१ टक्क्यांपर्यंत वाढवला

मुंबई : पश्चिम आशियातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवरही भारताची आर्थिक वाढ मजबूत राहील. एस अँड पी

डिजिटल माध्यमांवरील महिलांची बदनामी आता 'लैंगिक गुन्हा'

- 'भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२६' विधानसभेत सादर; 'शक्ती' कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींचा

दोन खाजगी कौशल्य विद्यापीठांना मान्यता, स्थानिक विद्यार्थ्यांसाठी ६० टक्के जागा राखीव; कौशल्य विकास मंत्री  मंगलप्रभात लोढा

खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक विधिमंडळात मंजूर अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षणाची गरज ओळखून नव्या