Thursday, March 26, 2026

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना आणि मदतीसाठीचे हेल्पलाईन आणि व्हॉटसॲप क्रमांक

आखाती देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालीन सूचना आणि मदतीसाठीचे हेल्पलाईन आणि व्हॉटसॲप क्रमांक

मुंबई : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार परदेशात वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी आवश्यक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाच्या नैसर्गिक आपत्ती शाखेमार्फत करण्यात आले आहे.

पॅलेस्टाईन (रामल्लाह), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद), कुवेत, बहारीन, मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरात (अबूधाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे, अनावश्यक हालचाली टाळाव्यात व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शासनाच्या वतीने वेळोवेळी करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशांतील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले असून, दूतावासांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

परदेशात वास्तव्यास असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, आणि आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासांशी संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. केंद्र सरकार व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून, महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगली जात आहे.

संबंधित देशांतील भारतीय दूतावासांचे संपर्क तपशील नागरिकांच्या सोयीसाठी प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार पॅलेस्टाईन (रामल्लाह) येथे फोन : +९७०-५९२९१६४१८, ई-मेल : repoffice@mea.gov.in/ cons.ramallah@mea.gov.in कतार (दोहा) येथे फोन : ००९७४-५५६४७५०२, ई-मेल : cons.doha@mea.gov.in सौदी अरेबिया (रियाध) येथे फोन : ००-९६६-११-४८८४६९७, व्हॉट्सॲप : ००-९६६-५४२१२६७४८, टोल फ्री : ८००-२४७-१२३४, ई-मेल : cw.riyadh@mea.gov.in इस्रायल (तेल अवीव) येथे फोन : +९७२-५४-७५२०७११/ +९७२-५४-२४२८३७८, ई-मेल : cons1.telaviv@mea.gov.in इराण (तेहरान) येथे फोन : +९८९१२८१०९११५, +९८९१२८१०९१०९, +९८९१२८१०९१०२, +९८९९३२१७९३५९, संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी / दुबई) येथे टोल फ्री : ८००-४६३४२, व्हॉट्सॲप : +९७१५४३०९०५७१, ई-मेल : pbsk.dubai@mea.gov.in /ca.abudhabi@mea.gov.in कुवेत येथे फोन : +९६५६५५०१९४६, ई-मेल : community.kuwait@mea.gov.in बहरीन येथे फोन : ००९७३-३९४१८०७१, मस्कत येथे टोल फ्री : ८००७१२३४, व्हॉट्सॲप : +९६८९८२८२२७०, ई-मेल : cw.muscat@mea.gov.in/ cons.muscat@mea.gov.in जॉर्डन येथे फोन : ००९६२-७७० ४२२ २७६ आणि इराक (बगदाद) येथे फोन : +९६४ ७७१ ६५१ ११८५ / +९६४ ७७०४४४ ४८९९, वेबसाईट : https://www.eoibaghdad.gov.in/ तसेच ई-मेल : cons.baghdad@mea.gov.in/ cons1.baghdad@mea.gov.in/ pol.baghdad@mea.gov.in नागरिकांना संपर्कासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय मुंबई जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष : ०२२-२२६६४२३२ / ०८६५७१०६२७३ आणि पोलीस नियंत्रण कक्ष : ०२२-२२६२३०५४ / ०२२-२२६२५०२० आदी पर्याय संपर्कासाठी उपलब्ध केले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही आवश्यकता असल्यास संपर्क साधण्याचे मुंबई शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

आखाती देशांत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी व्हॉटसॲप क्रमांक

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्ध परिस्थितीमुळे तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विविध नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः सातत्याने विविध यंत्रणांशी संपर्कात असून ते केंद्र सरकारसोबत सुद्धा सातत्याने संपर्क ठेवून आहेत. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना त्यांनी समन्वय कार्यात लक्ष घालण्यास सांगितले आहे. केंद्र सरकार सुद्धा सर्वतोपरी मदत महाराष्ट्र सरकारला करीत आहे. दुबईतील इंडियन पीपल्स फोरमच्या सोबत समन्वय साधून महाराष्ट्र सरकारने एक व्हॉटसॲप क्रमांक जारी केला असून ज्यांना मदतीची गरज आहे, त्यांनी या व्हॉटसॲप क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे. व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357

.......................................

युद्धाची स्थिती पाहता अबू धाबीतील भारतीय दुतावास आणि दुबईतील काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया यांचे प्रतिनिधी हे सातत्याने अबू धाबी व दुबईतील महाराष्ट्राच्या तसेच भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहेत. भारतीय नागरिकांसोबत झालेल्या चर्चेनुसार, दुतावासाने सांगितले की केंद्र सरकार व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. भारतीय नागरिकांनी अजिबात घाबरुन जाऊ नये, केंद्र सरकार संपूर्ण सहाय्य करेल. महाराष्ट्रातील जे लोक तेथे अडकले आहेत, त्यांनी अबू धाबीतील भारतीय दुतावास (@IndembAbuDhabi) आणि दुबईतील काउन्स्युलेट जनरल ऑफ इंडिया (@cgidubai) यांच्या अधिकृत एक्स खात्यावरील अपटेड पहावेत. महाराष्ट्रातील नागरिक हे सोबत जोडलेल्या ई-मेल आणि हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करू शकतात. याशिवाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुबईतील इंडियन पीपल्स फोरमशी संपर्कात आहेत. शासनाने महाराष्ट्रातील नागरिकांच्या मदतीसाठी एक व्हॉटसअ‍ॅप क्रमांक जारी केला आहे. व्हॉटसॲप क्रमांक : +97150 365 4357 (कृपया या क्रमांकावर केवळ मेसेज करायचा आहे)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा