Agriculture Department : कृषी निविष्ठा घोटाळ्याप्रकरणी १५ अधिकाऱ्यांचे निलंबन

- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा दणका; विभागीय चौकशीचे आदेश


मुंबई : धाराशिव जिल्ह्यातील कृषी विभागात राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत कृषी निविष्ठा वाटपात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार आणि गंभीर अनियमितता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. या घोटाळ्याप्रकरणी १५ कृषी अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले असून, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सर्व दोषी अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.


केंद्र व राज्य सरकारच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत (२०२५-२०२६) एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन या योजनांच्या अंमलबजावणीसाठी धाराशिव जिल्ह्यात सुमारे २४ कोटी रुपयांच्या कृषी निविष्ठांचे वाटप करण्यात आले होते. मात्र, या प्रक्रियेत प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीला डावलून गैरव्यवहार करण्यात आल्याचा आरोप झाला होता. तपासादरम्यान मृत शेतकरी तसेच कागदोपत्री बनावट लाभार्थी तयार करून कोट्यवधी रुपयांच्या निविष्ठा कागदावरच वाटल्याचे दाखवण्यात आल्याचे समोर आले.


या घोटाळ्याची गंभीर दखल घेत कृषी विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. निलंबित करण्यात आलेल्या १५ अधिकाऱ्यांमध्ये तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी, जिल्हा कृषी उपसंचालक, कृषी अधिकारी आणि कृषी सहायकांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आली असून, प्रशासकीय अनियमिततेसोबतच आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी केली जाणार आहे.

राज्यभरातील कृषी यंत्रणेला इशारा


शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही, असा इशारा कृषीमंत्र्यांनी दिला आहे. या चौकशीत आणखी काही वरिष्ठ अधिकारी आणि कंत्राटदारांचे लागेबांधे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात असून, चौकशी अंती दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मंत्री भरणे यांच्याकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व