बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे उपकेंद्र कोकणात करा; आमदार प्रवीण दरेकरांची सरकारकडे मागणी

मुंबई : हिंगोली येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या धर्तीवर कोकणातही या केंद्राचे उपकेंद्र स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजप गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत केली. कोकणातील, विशेषतः राजापूरच्या हळदीला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देण्यासाठी आणि स्थानिक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे केंद्र अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



हिंगोलीच्या प्रकल्पाला गती देण्याची मागणी


विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सदस्य हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्यातील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राच्या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादनात अग्रेसर असून, तेथील संशोधन केंद्र अधिक सक्षम होणे आवश्यक असल्याचे मत सभागृहात व्यक्त करण्यात आले.


या चर्चेत सहभागी होत आमदार प्रवीण दरेकर यांनी कोकणातील हळद उत्पादकांचे प्रश्न मांडले. दरेकर म्हणाले की, "हिंगोलीत मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन होते आणि तिथले केंद्र मजबूत झालेच पाहिजे. मात्र, त्याच वेळी कोकणातील राजापूरची हळद देखील अत्यंत प्रसिद्ध आणि गुणकारी मानली जाते. जर बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्राचे एक उपकेंद्र कोकणात सुरू झाले, तर तिथल्या हळदीच्या उत्पादनाला शास्त्रीय जोड मिळेल आणि उत्पादनात मोठी वाढ होईल."



मंत्री भरत गोगावले यांचे सकारात्मक आश्वासन


आमदार दरेकर यांनी फलोत्पादन मंत्र्यांनी या उपकेंद्राची तातडीने घोषणा करावी, अशी मागणी सभागृहात लावून धरली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले की, कोकणात हळद संशोधन उपकेंद्र सुरू करण्याच्या आमदार दरेकरांच्या मागणीचा सरकार निश्चितपणे विचार करेल. सरकारच्या या आश्वासनामुळे कोकणातील हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

मिरा-भाईंदरमध्ये अग्नितांडव; ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईजवळील मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ४ ते ५

आरोग्य समिती अध्यक्षांचा पहिला वहिला अनोखा प्रयोग

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांची माहिती आरोग्य समितीच्या

मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना

मुंबई: अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या नियोजित बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी

खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक परिषदेत मंजूर

मुंबई : राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खाजगी कौशल्य

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना मोठी भेट

मुंबई : ठाणे महानगरपालिकेतील 'गट ड' श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला

म्हाडा गाळेधारकांना मोठा दिलासा! भाडेकरार धोरणासाठी विशेष समिती स्थापन करणार; मंत्री शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती

मुंबई : मुंबईसह राज्यातील म्हाडा वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांच्या अनेक वर्षांच्या