मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या विरोधात हक्कभंगाची सूचना

मुंबई: अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या नियोजित बैठकीस गैरहजर राहिल्याबद्दल मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाची सूचना देण्यात आली आहे. याप्रकरणी आयुक्तांचा खुलासा प्राप्त झाला असून, हे प्रकरण विशेष हक्क समितीकडे पाठविण्याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी राखून ठेवला आहे.


भाजप आमदार राजू तोडसाम यांनी मंगळवारी विधानसभेत अनुसूचित जमाती कल्याण समितीचा पहिला अहवाल सादर केला. यावेळी त्यांनी पालिका आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत हक्कभंगाचा मुद्दा उपस्थित केला.


विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांचा समावेश असलेली अनुसूचित जमाती कल्याण समिती ४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबई महानगरपालिकेच्या दौऱ्यावर होती. या नियोजित बैठकीची पूर्वसूचना प्रशासनाला देण्यात आली होती. असे असूनही, पालिका आयुक्त भूषण गगराणी आपल्या दालनात उपस्थित असतानाही समितीच्या बैठकीला फिरकले नाहीत. इतकेच नव्हे तर, राजशिष्टाचारानुसार त्यांनी समितीचे स्वागतही केले नाही, असा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.


आदिवासी समाजाच्या प्रश्नांसाठी कार्यरत असलेल्या समितीसोबत आयुक्तांनी केलेले हे वर्तन अत्यंत खेदजनक असून, या कृतीने आदिवासी समाज आणि पर्यायाने विधिमंडळाचा अवमान झाला आहे, अशी भावना समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. या कारणास्तव समितीच्या सर्व सदस्यांनी एकमताने आयुक्तांविरुद्ध हक्कभंगाची सूचना दिली असून, हे प्रकरण विशेष हक्क समितीकडे चौकशीसाठी पाठवावे, अशी मागणी तोडसाम यांनी केली.


अध्यक्षांनी निर्णय ठेवला राखून
या हक्कभंग प्रस्तावावर स्पष्टीकरण देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, "या संदर्भात संबंधित विभागामार्फत पालिका आयुक्तांचा खुलासा मागवण्यात आला होता आणि तो आता प्राप्त झाला आहे. त्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण विशेष हक्क समितीकडे पाठवायचे की नाही, याचा योग्य निर्णय घेऊन तो जाहीर केला जाईल. तोपर्यंत मी माझा निर्णय राखून ठेवत आहे", असेही त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Mumbai's Bandra Fire : वांद्रे पश्चिम येथील इमारतीला आग; ७ जण रुग्णालयात

मुंबई : स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा होत असताना मुंबईच्या पश्चिम उपनगरातून मोठी बातमी आली आहे. वांद्रे पश्चिम

Devendra Fadnavis : बंदुकीपेक्षा 'बौद्धिक' नक्षलवाद अधिक घातक, 'वंदे मातरम्'मुळे सोनिया गांधी नारज होणे हा 'दिमागी नक्षलवाद'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “देशात बंदुकीच्या तालावर चालणारा हिंसक नक्षलवाद आता संपत आला असला, तरी लोकांच्या डोक्यामध्ये अराजकता

Ravindra Chavan : विकसित भारत 2047 च्या संकल्पात प्रत्येक नागरिकाचे योगदान मोलाचे

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण प्रसंगी भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे

Navroz 2026 : दादर पारसी कॉलनीत उत्साहात नवरोज साजरा; पारसी बांधवांकडून नवीन वर्षाचे स्वागत

मुंबई: शनिवारी मुंबईत पारसी समाजान

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

- राज्य सरकारचा निर्णय; 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे प्रमाणपत्र बंधनकारक मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध