ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना मोठी भेट

मुंबई : ठाणे महानगरपालिकेतील 'गट ड' श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी असलेली पाच वर्षांची अट शिथिल करून ती तीन वर्षे करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधान परिषदेत दिली. आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी नियम ९७ अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.


इतर महापालिकांच्या धर्तीवर होणार बदल


मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात माहिती दिली की, पदोन्नतीसाठीचा हा विषय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चिला गेला आहे. सध्या कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि अकोला महानगरपालिकांमध्ये पदोन्नतीसाठी तीन वर्षांचा निकष लागू आहे. याच धर्तीवर ठाणे महानगरपालिकेतही तीन वर्षांची नियमित सेवा पूर्ण केलेल्या आणि आवश्यक पात्रता असलेल्या कर्मचाऱ्यांना 'वर्ग ३' मध्ये पदोन्नती देण्यासाठी शासन सकारात्मक आहे.


पुढील प्रक्रिया आणि ठराव


हा निर्णय अंमलात आणण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा अधिकृत ठराव राज्य सरकारला प्राप्त होणे आवश्यक आहे. हा ठराव प्राप्त होताच अन्य महानगरपालिकांप्रमाणे ठाणे पालिकेतही पदोन्नतीचा नवा नियम लागू करण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.


अनुकंपा नियुक्तीबाबत संवेदनशील भूमिका


पदोन्नतीसोबतच अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांच्या विषयावरही मंत्र्यांनी महत्त्वाची टिप्पणी केली. "अनुकंपा नियुक्ती हा विषय अत्यंत संवेदनशील असून पात्र कुटुंबीयांना वेळेत न्याय मिळणे आवश्यक आहे," असे सामंत म्हणाले. ठाणे महानगरपालिकेच्या आगामी भरती प्रक्रियेत, विशेषतः शिक्षण मंडळामध्ये प्रलंबित असलेल्या अनुकंपा प्रकरणांचा समावेश करण्याबाबत पालिकेला सुचित केले जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा