म्हाडा गाळेधारकांना मोठा दिलासा! भाडेकरार धोरणासाठी विशेष समिती स्थापन करणार; मंत्री शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती

मुंबई : मुंबईसह राज्यातील म्हाडा वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांच्या अनेक वर्षांच्या मागणीची दखल राज्य सरकारने घेतली आहे. म्हाडाच्या गाळ्यांसाठी सध्या असलेल्या ११ महिन्यांच्या 'लिव्ह अँड लायसन्स' कराराऐवजी दीर्घ मुदतीचा करार करण्याबाबत सर्वंकष धोरण आखण्यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत केली.


आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, मुंबई मंडळाच्या सह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केली जाईल. ही समिती केवळ म्हाडाच नव्हे, तर इतर शासकीय वसाहतींमध्ये राबवल्या जाणाऱ्या भाडेपट्टा पद्धतींचाही सखोल अभ्यास करेल. पुढील तीन महिन्यांत ही समिती आपला अहवाल सादर करेल आणि त्यानंतर भाडेपट्ट्याचा कालावधी वाढवण्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.



गाळेधारकांच्या मागणीला यश


म्हाडा वसाहतींमधील रहिवाशांना जीवनावश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी हे गाळे भाड्याने दिले जातात. मात्र, दर ११ महिन्यांनी होणाऱ्या करारामुळे गाळेधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. गाळेधारकांनी या कराराची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर, ही समिती दीर्घ किंवा अल्प मुदतीचे करार, अनामत रकमेची (Deposit) अट आणि इतर कायदेशीर बाबींवर आपल्या शिफारसी देणार आहे. जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही आणि नवीन धोरण निश्चित होत नाही, तोपर्यंत सध्याच्या गाळेधारकांची गैरसोय होऊ नये, याचीही काळजी सरकारने घेतली आहे. ज्या गाळेधारकांनी विद्यमान ११ महिन्यांच्या करारातील सर्व अटी पूर्ण केल्या आहेत, त्यांच्या लायसन्सचे नूतनीकरण कोणत्याही विलंबशिवाय तातडीने करण्याचे निर्देशही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले. या चर्चेत आमदार प्रवीण दरेकर यांनीही सहभाग घेऊन गाळेधारकांच्या समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

Comments
Add Comment

Azad Maidan Protest : आझाद मैदान वगळता मुंबईत सर्व ठिकाणी आंदोलनास बंदी

- गृह विभागाचे तातडीचे आदेश; मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची खबरदारी मुंबई : मराठा आंदोलक

Maharashtra Pollution Control Board : उद्योग क्षेत्रातील 'लायसन्स राज'ला लगाम

- प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्कात कपात; ५ ते २५ वर्षांची रक्कम एकत्रित भरण्याची सोय मुंबई : राज्यातील

Devendra Fadnavis : सुट्या खाद्यतेल विक्रीबाबत 'एसओपी' तयार करा! मुख्यमंत्र्यांची 'एफडीए'ला सूचना

- छोट्या व्यापाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत मध्यम मार्ग काढण्याचे निर्देश मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Bhuleshwar : १५० मीटरवर मिरवणूक थांबली अन्...; 'भुलेश्वरचा राजा' प्रकरणात धक्कादायक गौप्यस्फोट

मुंबई : ‘भुलेश्वरचा राजा’ गणेशमूर्ती दुर्घटनेच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. २२ फूट उंचीची भव्य

Mumbai Contractor Suicide : धक्कादायक! मुंबईत कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; थकीत बिलांमुळे मानसिक आणि आर्थिक तणाव?

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गजानन देवकाते नावाच्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची घटना

BMC Ganesh Utsav Guidelines : गणेशमूर्तींसाठी ‘फिटनेस प्रमाणपत्र’ अनिवार्य? मुंबई महापालिकेने स्पष्ट केली भूमिका