मिरा-भाईंदरमध्ये अग्नितांडव; ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात

मुंबई: मुंबईजवळील मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये ४ ते ५ इमारती आगीच्या विळख्यात सापडल्या आहेत. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मिरा-भाईंदरमधील प्लेझंट पार्क परिसरात रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केलं. परिसरातील चार ते पाच इमारती या आगीच्या विळख्यात सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग इतक्या वेगाने पसरली की, काही घरांनाही तिचा फटका बसला. घटनेनंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले असून वातावरण अत्यंत धोकादायक बनले आहे.


आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, ही आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक तास प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने परिसर सुरक्षित करण्यासाठी खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, काही प्राथमिक माहितीनुसार गॅस सिलेंडर स्फोटाची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या