तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क करायचा हाच मानस आमचा सत्ताधारी पक्षाचा आहे. परंतु काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सातत्याने प्रत्येक विषयांवर जागा सोडून जर पुढे येत असतील तर त्यावर रिऍक्शन ही होणारच. सभागृहात तुम्हालाच गोंधळ घालता येतो असे नाही तर आम्हालाही गोंधळ घालता येतो, आतापर्यंंत आम्ही विरोधी पक्षातच होतो आणि गोंधळ कसा घालायचा याचेही आम्हाला चांगलेच माहिती आहे. आम्ही त्यात एक्सपर्ट आहोत अशा शब्दांत महापालिका सभागृहात गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या गटनेत्यासह नगरसेवकाची कानउघडणी केली.


मुंबई महापालिकेच्या सभेत हैदर शेख यांनी मांडलेल्या ठरावाच्या सूचनेवर भाजपचे प्रविण छेडा यांनी हरकत घेतली. यावर काँग्रेसचे गटनेते अश्रफ आझमी यांनी ठरावाच्या सूचनेचे समर्थन करत हरकतीच्या मुद्दयाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावर भाजपचे योगेश वर्मा यांनी सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केल्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक आक्रमक झाले आणि त्यांनी जागा सोडून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. काँग्रेसच्या नगरसेवकांकडून हा गोंधळ सुरुच असल्यामुळे अखेर सभागृहनेते गणेश खणकर यांनी शेलक्या शब्दांत काँग्रेस नगरसेवकांचा समाचार घेतला.


गणेश खणकर यांनी आपल्या भाषणात प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचे मत मांडायचा अधिकार असून प्रत्येक पक्षाची मत मांडावे. तसेच या सभागृहात आम्ही मुंबईकरांची अपेक्षा पूर्ण करायला आलो आहोत, त्यामुळे या सभागृहाचे नियम न मोडत आपल्या सर्वांंना सोबत घेवून काम करायचे आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाने आधी गैरसमज करून घेवू नये. आणि आपल्याला जर गोंधळ घालायचा असेल तर आम्ही आपल्यापेक्षा एक्सपर्ट आहोत, अनेक वर्षे आम्ही विरोधी पक्षातच होतो. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी आधी हे लक्षात घ्यावे आणि गोंधळ घालण्याचा पुन्हा प्रयत्न करावा, पण त्यानंतर जी प्रतिक्रिया उमटेल ती सहन करण्याचीही तयारी ठेवावी अशाप्रकारचाही इशारा त्यांनी दिला.


महापौरांनीही झापले नगरसेवकांना


सभागृहातील नियमित तिसऱ्या सभागृहात उपस्थित नगरसेवकांकडून नाव न पुकारण्याआधीच बोलण्यासाठी उभे राहत असल्याची बाबत निदर्शनास आल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना चांगलीच समज दिली. जोवर मी आपले नाव पुकारत नाही,तोवर कुठल्याही सदस्याने उभे राहून बोलण्याचा प्रयत्न करू नये. तसेच सभागृहामध्ये व्हिडीओ चित्रण करण्यात येवू अशाप्रकारच्या सूचना करत चांगलेच झापले. त्यामुळे महापौरांच्या सूचनेनंतर तरी सभागृहात नगरसेवकांकडून चांगल्याप्रकारची वर्तवणूक होईल अशाप्रकारचा आशा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश  २०० कोटींच्या दंड

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :