Inspirational Story: दोन भावांची सोशल मीडियावर तुफान चर्चा, कमी वयात...

मुंबई: किशोर मंडल आणि त्याचा लहान भाऊ कृष मंडलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. अतिशय कमी वयात या दोन्ही भावांनी त्यांच्या गायकीने लाखो लोकांची मने जिंकली आहेत. कृष फक्त ७ वर्षांचा आहे. पण त्याच्या आवाजातील पकड आणि गोडवा पाहून लाखो लोक आश्चर्यचकित झालं आहेत. नावलौकीक मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत करावी लागते, असं म्हटलं जातं.पण मंडल ब्रदर्स याला अपवाद आहेत.प्रचंड मेहनतीच्या जोरावर तुम्ही तुमचं कलाकौशल्य सिद्ध केलं,तर वयाचा कोणीही विचार करत नाही. तुमच्या यशाच्या शिखरावर वय कधीच अडथळा ठरत नाही.


कृष त्याच्या मोठा भाऊ किशोरसोबत गाणी गातो.दोघेही एकत्र बसून सिंगिंग व्हिडिओ रेकॉर्ड करतात आणि ते सोशल मीडियावर शेअर करतात.त्यांच्या व्हिडीओंना लाखोंच्या संख्येत व्ह्यूज मिळतात. लोक त्यांच्या आवाजावरच नाही,तर त्यांच्या साधेपणावरही फिदा झाले आहेत. कोणताही दिखाऊपणा नाही.साध्या-सरळ पद्धतीने गायलेले त्यांचे गाणे लोकांच्या मनाला भिडतात.



मंडल ब्रदर्सची फॅन फॉलोईंग झपाट्याने वाढली


याच कारणामुळे इंस्टाग्राम,यूट्यूब आणि फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर त्यांची फॅन-फॉलोइंग झपाट्याने वाढत आहे. अनेक लोक त्यांची गाणी री-शेअर करतात आणि कमेंटमध्ये त्यांचं कौतुक करतात. मंडल ब्रदर्स यांनी अलीकडेच जवळपास ७० लाख रुपयांची लक्झरी SUV Mercedes-Benz GLE खरेदी केली आहे. इतक्या कमी वयात अशी उपलब्धी मिळवणे ही मोठी गोष्ट आहे. सोशल मीडियावर त्यांचे नवीन कारसोबतचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत.





काही दिवसांपूर्वी मंडल ब्रदर्स यांनी ‘दिल लगाना मना था'हे गाणे आपल्या आवाजात सादर केले होते. हे गाणे सोशल मीडियावर काहीच मिनिटांत व्हायरल झाले. लोकांनी या गाण्यावर प्रचंड रील्स बनवल्या आणि हे गाणे यूट्यूबसोबतच इंस्टाग्रामवरही ट्रेंड होऊ लागले.म्युझिक व्हिडिओमध्ये टीव्ही कलाकार सनम जौहर आणि आशी सिंग दिसले. गाण्यात अधुरी प्रेमकहाणी आणि ब्रेकअपनंतरच्या भावना सुंदररीत्या दाखवण्यात आल्या होत्या. या गाण्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शवली. ३५ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेल्या या गाण्याच्या यशानंतरच मंडल ब्रदर्स यांनी एक लक्झरी कार खरेदी केली आहे.

Comments
Add Comment

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :