भारताचा विजय, पुढील फेरीची आशा कायम; दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये आणि झिम्बाब्वेचे आव्हान संपले

चेन्नई : आयसीसी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये सुपर एट फेरीचे आजचे दोन्ही सामने सुपरहिट झाले. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना ९ विकेट राखून जिंकला तर भारताने झिम्बाब्वे विरुद्धचा सामना ७२ धावांनी जिंकला. यामुळे ग्रुप एक मधून दक्षिण आफ्रिका सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. भारताची पुढील फेरीत जाण्याची आशा कायम आहे. आता वेस्ट इंडिज विरुद्धचा रविवारचा सामना जिंकल्यास भारत पुढल्या फेरीत जाईल. पण झिम्बाब्वेचे वर्ल्डकप २०२६ मधील आव्हान संपले आहे.


नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणे झिम्बाब्वेला भोवले. भारताने २० षटकांत ४ बाद २५६ धावा केल्या तर झिम्बाब्वेला २० षटकांत ६ बाद १८४ धावा करणेच जमले. भारताकडून नाबाद अर्धशतक झळकावणारा हार्दिक पांड्या सामनावीर झाला.


झिम्बाब्वेची फलंदाजी


झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने नाबाद ९७, तदिवानाशे मारुमणीने २०, डायन मायर्सने ६, सिकंदर रझाने ३१, रायन बर्लने शून्य, टोनी मुनयोंगाने ११, ताशिंगा मुसेकिवाने ७, ब्रॅड इव्हान्सने नाबाद १ धावांचे योगदान दिले. भारताच्या अर्शदीपने ३, वरुण चक्रवर्तीने १, अक्षर पटेलने १, शिवम दुबेने १ विकेट घेतल्या.


भारताची फलंदाजी


भारताकडून संजू सॅमसनने १५ चेंडूत २ षटकार आणि १ चौकार मारत २४ धावा केल्या. अभिषेक शर्माने ३० चेंडूत प्रत्येकी ४ षटकार आणि ४ चौकार मारत ५५ धावा केल्या. ईशान किशनने २४ चेंडूत ३८ धावा करताना १ षटकार आणि ४ चौकार मारले. कर्णधार सूर्यकुमार यादवने १३ चेंडूत २ षटकार आणि ३ चौकार मारत ३३ धावा केल्या. हार्दिक पांड्याने २३ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकार मारत नाबाद ५० धावा केल्या तर तिलक वर्माने १६ चेंडूत ४ षटकार आणि ३ चौकार मारत नाबाद ४४ धावा केल्या. हार्दिक आणि तिलकने ३१ चेंडूत १६.२५ च्या रनरेटने ८४ धावांची नाबाद भागीदारी केली. झिम्बाब्वेने टाकलेल्या एवढ्या चेंडूंपैकी फक्त २६ चेंडू निर्धाव होते उर्वरित प्रत्येक चेंडूवर भारताने किमान एक धाव काढली होती. झिम्बाब्वेकडून सिकंदर रझा, ब्लेसिंग मुजराबानी, रिचर्ड नगारावा आणि टिनोटेंडा मापोसाने प्रत्येकी १ विकेट घेतली.


सूर्यकुमार यादवचा पराक्रम


सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. सूर्याने आतापर्यंत १४८ आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या १४० डावांत ३४.१ च्या सरासरीने ४०२४ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर चार शतके आणि २९ अर्धशतके आहेत.



भारत - झिम्बाब्वे सामन्यात षटकारांचा पाऊस


भारत - झिम्बाब्वे सामन्यात षटकारांचा पाऊस पडला. भारताने १७ तर झिम्बाब्वेने ११ षटकार मारले. विशेष म्हणजे भारताच्या प्रत्येक फलंदाजाने आज १५० पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावा काढल्या आणि झिम्बाब्वेच्या प्रत्येक गोलंदाजाची धुलाई केली. टी ट्वेंटी वर्ल्डकपमधील एका सामन्यातील एका डावातल्या सर्वाधिक षटकारांच्या बाबतीत भारताने विक्रम नोंदवला. झिम्बाब्वेने टाकलेल्या एवढ्या चेंडूंपैकी फक्त २६ चेंडू निर्धाव होते उर्वरित प्रत्येक चेंडूवर भारताने किमान एक धाव काढली होती.

Comments
Add Comment

Jasprit Bumrah : आयसीसी टी-२० क्रमवारी जसप्रीत बुमराहची टॉप ५ मध्ये नोंद

मुंबई : भारताने ८ मार्च रोजी टी२० विश्वचषक जिंकल्यापासून एकही टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि

Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज

SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच

खेळाडूंची ‘A+’ श्रेणीच रद्द? BCCIचा मोठा निर्णय; बुमराह- जडेजाच्या मानधनात होणार घट

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय २०२५-२६ हंगामासाठी क्रिकेटपटूंच्या वार्षिक करार आणि मानधन

आयपीएल 2026 : विराट कोहली बंगळूरुमध्ये दाखल

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा माजी कर्णधार आणि महान क्रिकेटपटू विराट कोहली आयपीएल २०२६ साठी संघात सामील

Chinnaswamy Stadium IPL 2026 : चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबीचे सामने आयोजित करण्यास हिरवा कंदील

आयपीएल २०२६ दरम्यान बंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे सामने आयोजित करण्यातील