Gudi Padwa 2026 : सचिन तेंडुलकर, सूर्यकुमार आणि अजिंक्य रहाणेने यांच्यासह अनेक खेळाडूंनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर, नुकताच भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा सूर्यकुमार यादव, माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंह, बीसीसीआयचे 'क्रिकेट ऑफ एक्सलन्स'चे प्रमुख आणि माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण, माजी फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे आणि अजिंक्य रहाणे यांनी सोशल मीडियाद्वारे देशवासियांना गुढीपाडवा आणि उगादीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


सचिन तेंडुलकरने आपल्या एक्स अकाउंटवर लिहिले, "तुम्हाला व कुटूंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा… हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच प्रार्थना करतो. " सूर्यकुमार यादवने लिहिले, "नव्या स्वप्नांसह एका नव्या सुरुवातीचे स्वागत करा. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा."





अजिंक्य रहाणेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात आनंद आणि यश घेऊन येवो." अनिल कुंबळे यांनी लिहिले, "उगादीच्या या शुभप्रसंगी, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा."


हरभजन सिंहने एक्स अकाउंटवर लिहिले, "नवीन वर्ष, नवी ऊर्जा, एक नाते. आपण आरोग्याने, परंपरेने, तुमच्यामुळे जोडलेले आहोत. उगादी आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा."





तर व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी लिहिले, "नवीन वर्ष. अनेक परंपरा." उगादी, गुढी पाडवा, चेटी चांद, नवरेह, साजिबू नोंगमा पानबा यांच्या हार्दिक शुभेच्छा. विविधतेतील एकतेचा उत्सव. सर्वांना नवीन सुरुवात आणि अमर्याद संधींच्या शुभेच्छा.

Comments
Add Comment

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा

FIH Hockey World Cup : अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद; नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये मात

ॲमस्टेलवीन : अर्जेंटिनाने महिला हॉकी विश्वचषक जिंकला. एका रोमांचक अंतिम सामन्यात त्यांनी सह-यजमान नेदरलँड्सला