SRH IPL 2026 : ईशान किशन आणि अभिषेक शर्मावर हैदराबाद संघाने टाकली मोठी जबाबदारी

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या आधी, सनरायझर्स हैदराबादने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताच्या नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा युवा फलंदाज ईशान किशनची संघाने कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे पॅट कमिन्सच्या जागी ईशान किशन संघाचं नेतृत्त्व करणार आहे. तर अभिषेख शर्मा यांची उपकर्णधार पदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.


दुखापतीमुळे पॅट कमिन्स हंगामातील सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. तो परत येईपर्यंत ईशान किशन संघाचं नेतृत्व करणार आहे.


सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले, "पॅट कमिन्स दुखापतीतून सावरत आहे आणि हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. तो बरा होईपर्यंत, ईशान किशन संघाचे नेतृत्व करेल आणि अभिषेक शर्मा उपकर्णधार असेल. ईशानने या हंगामात झारखंडला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून दिली. त्याने संपूर्ण हंगामात दमदार खेळ केला आणि याच कामगिरीमुळे त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. ईशान गेल्या वर्षीच हैदराबाद संघात सामील झाला आणि त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा त्याच्यावर असणार आहेत.


हैदराबाद संघाने २०१६ मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली आपले पहिले विजेतेपद पटकावले होते. २०२४ मध्ये, पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम फेरीत पोहोचला होता. पण कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभूत झाला. कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबादने अपवादात्मक कामगिरी केली आहे. हा संघ अत्यंत आक्रमक असून आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, ज्यामध्ये अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी यांसारखे स्फोटक फलंदाज आहेत.

Comments
Add Comment

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

Namibia T20I Tri-Series : दक्षिण आफ्रिकेचा झिम्बाब्वेवर सात गडी राखून दणदणीत विजय

नवी दिल्ली : झिम्बाब्वेला सात गडी राखून पराभूत करून दक्षिण आफ्रिकेने तिरंगी मालिकेत आपले आव्हान कायम ठेवले आहे.

Asian Games 2026 : दुखापतीमुळे नीरजची माघार; यश वीरला मिळणार संधी ?

नवी दिल्ली : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा