'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी अर्थात २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करतात. महाराष्ट्र या राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली आणि मराठी भाषिकांचे राज्य असलेल्या महाराष्ट्रात १ मे १९६५ पासून दरवर्षी महाराष्ट्र दिनी अर्थात १ मे रोजी मराठी राजभाषा दिन अर्थात मराठी भाषा दिन किंवा 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात.


'मराठी राजभाषा दिन' साजरा करण्याबाबतचा निर्णय १९६५ मध्ये तत्कालीन वसंतराव नाईक सरकारने घेतला होता. महाराष्ट्राची राजभाषा मराठी असेल असेही वसंतराव नाईक सरकारने जाहीर केले. 'मराठी राजभाषा अधिनियम १९६४' हा ११ जानेवारी १९६५ रोजी प्रसिद्ध झाला. हाच अधिनियम पुढे कायदा म्हणून १९६६ पासून अंमलात आला.


मातृभाषेचा गौरव दिन


कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले. याच कारणामुळे त्यांच्या सन्मानार्थ २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा करतात.

Comments
Add Comment

Maharashtra Delivery Boy Police Verification : यापुढे ‘डिलिव्हरी बॉईज’ची तपासणी बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

कामगार मंत्र्यांचे गृह विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि

Gautam Birhade : गौतम बिर्‍हाडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नवे संचालक

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) संचालक (प्रकल्प) पदी ज्येष्ठ अभियंता गौतम बिर्‍हाडे (Gautam Birhade)

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून