महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासमोर मोठे आव्हान: वर्षात ४१ वाघांना मुकलो, मानवनिर्मित कारणांमुळे धोक्यात वाढ

मुंबई : महाराष्ट्र राज्यामध्ये २०२५ या एकाच वर्षात तब्बल ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती वनमंत्र्यांनी विधानसभेत लेखी उत्तराद्वारे सादर केली आहे. या मृत्यूंच्या कारणांचा आढावा घेतल्यास असे दिसून येते की, २८ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी झाला असला तरी, उर्वरित १३ वाघांचा बळी हा मानवी हस्तक्षेप आणि अपघातांमुळे गेला आहे; यात ८ वाघ विविध अपघातांमध्ये, ४ वाघ विजेचा धक्का लागल्याने, तर १ वाघ शिकारीमुळे दगावला आहे.


या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने रेल्वे आणि रस्ते अपघात रोखण्यासाठी वनक्षेत्रातील प्रस्तावित प्रकल्पांमध्ये वन्यप्राण्यांच्या सुरक्षित वावरासाठी अंडरपास व ओव्हरपास बांधण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच रेल्वेचा वेग ताशी ४० किमीपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या सूचनाही केल्या आहेत. शिकारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी 'विशेष व्याघ्र संरक्षण दल' सक्रिय करण्यात आले असून, वनपरिक्षेत्र स्तरावर खबऱ्यांची जाळी, बिनतारी यंत्रणा आणि तपासणी नाक्यांद्वारे कडक पाळत ठेवली जात आहे. याशिवाय, वाघांच्या भ्रमणमार्गावर कॅमेरा ट्रॅप बसवणे, पंधरवड्यातून एकदा त्यांच्या अस्तित्वाचा मागोवा घेणे आणि पाणवठ्यांवरील विषप्रयोगासारख्या घटना रोखण्यासाठी नियमित गस्त घालणे अशा उपाययोजना राबविल्या जात आहेत.


व्याघ्र प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतानाही वाघांचे होणारे मृत्यू ही पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर बाब असून, मानव-वन्यजीव संघर्ष रोखणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करणे, हेच खऱ्या अर्थाने संपूर्ण जंगलव्यवस्थेच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Delivery Boy Police Verification : यापुढे ‘डिलिव्हरी बॉईज’ची तपासणी बंधनकारक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

कामगार मंत्र्यांचे गृह विभागाला सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश मुंबई : ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि

Gautam Birhade : गौतम बिर्‍हाडे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे नवे संचालक

मुंबई : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) संचालक (प्रकल्प) पदी ज्येष्ठ अभियंता गौतम बिर्‍हाडे (Gautam Birhade)

चित्र साकारताना कल्पनाशक्तीची ज्योत सतत तेवत ठेवा; शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांचा संदेश

मुंबई: चित्रकला म्हणजे मनातील विचारांना कागदावर उतरविण्याचे साधन असते. यात निसर्गातील विविध रंगांसह आपल्या

मुंबई महापालिका रुग्णालयांमधील मिळणार खाटांची माहिती; डॅशबोर्डची सेवा उपलब्ध करून देणार

मुंबई: नागरिकांना महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपलब्ध रुग्णशया व अतिदक्षता विभागातील रुग्णाशय्या इत्यादी

घाटकोपरवासियांचा १० एप्रिल २०२६ पासून पाणीपुरवठा पूर्ववत; पुढील काही दिवस उकळून प्यावे लागणार पाणी

मुंबई: घाटकोपर (पश्चिम) येथील घाटकोपर निम्नस्तरीय जलाशयातील दोन कप्प्याच्या दुरुस्तीचे काम महानगरपालिकेच्या

MLA Amit Satam सीसी रस्त्यांमुळे खड्डे दुरुस्तीवरील खर्चात जवळपास ७० टक्क्याहून अधिक घट — भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम

आमदार अमीत साटम यांनी घेतला सीसी रस्त्यांच्या कामांचा आढावा मुंबई : भाजप-नेतृत्वाखालील महायुती सरकारकडून