शेतकऱ्यांच्या हितासाठी मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन; कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी!

अतिवृष्टीमुळे काढणीला उशीर; अनेक शेतकरी एमएसपीपासून वंचित राहण्याची भीती


चंद्रपूर - राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०२५-२६ हंगामातील कापूस खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली २७ फेब्रुवारी २०२६ ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) लाभ मिळावा आणि अतिवृष्टीमुळे उशिरा सुरू झालेल्या काढणीमुळे कोणीही वंचित राहू नये, या उद्देशाने त्यांनी पत्राद्वारे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे. यासोबतच सीसीआय मुंबईचे चेअरमन ललितकुमार गुप्ता यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी केली आहे.


मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे की, भारतीय कपास निगम लिमिटेड (सीसीआय) मार्फत एमएसपी अंतर्गत कापूस खरेदीची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. कपास किसान ॲपवर नोंदणीकृत शेतकऱ्यांना या मुदतीपूर्वी स्लॉट बुक करून जवळच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीत अद्याप ओलावा कायम असून कापूस वेचणी व काढणीला विलंब होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यासह विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरी अजून कापूस पोहोचलेला नाही. त्यामुळे ते एमएसपी योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


शेतकऱ्यांच्या अडचणींप्रती कायम संवेदनशील असलेले नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या परिस्थितीची तातडीने दखल घेत मुदतवाढीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर कृषी मूल्य आयोगाचे सदस्य बंडू मधुकर गौरकार यांनी सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले असून, त्याची दखल घेत, मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत मुदतवाढीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सीसीआयमार्फत खरेदीची अंतिम तारीख ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.


तसेच, संबंधित विभागांना तातडीने निर्देश देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. यासोबतच सीसीआय मुंबईचे चेअरमन ललितकुमार गुप्ता यांच्याकडेही मुनगंटीवार यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे.राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, आता मुख्यमंत्र्यांकडून याबाबत कोणती भूमिका घेतली जाते याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Nashik Crime : तरुणाचा गळा आवळून खून, परिसरात खळबळ

Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात

Simhastha Kumbh Mela : सिंहस्थात महिलांना रोजगाराची मोठी संधी ! ९ हजारांहून अधिक बचत गटांचा सहभाग

Simhastha Kumbh Mela : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील महिला बचत गट आणि एकल महिलांसाठी

Devendra Fadnavis : तिबेटमध्ये अडकलेल्या ३७ महाराष्ट्रातील नागरिकांची मुख्यमंत्री फडणवीसांमुळे सुटका

- सागाहून काठमांडूकडे सुरक्षित प्रवास सुरू; ठाणे, पुणे, अलिबाग, रायगड आणि डोंबिवली परिसरातील भाविकांचा

Nashik : सिंहस्थाच्या स्वागतासाठी नाशिक सज्ज ! ‘कुंभ भक्ती संगम’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Nashik : नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची (Simhastha Kumbh Mela) सांस्कृतिक नांदी आजपासून होत

Keshav Srushti : केशवसृष्टीत सहल नेण्याचा काँग्रेस, सपाचा विरोध मोडून काढला

महापालिका सातवीच्या मुलांची सहल केशवसृष्टीत जाणारच, स्थायी समितीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी)

Mumbai Mayor : मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचाच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल