Pune: पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांची धाड; पळून जाण्याच्या नादात महिलेचा...

पुणे: पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या विमाननगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील रूट स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. त्यानंतर मॅनेजरसह महिलेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी खिडकीतून उडी मारण्याच्या प्रयत्नात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर स्पा सेंटर मधील मॅनेजर गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विमाननगर येथील रूट स्पा मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी या ठिकाणी छापा टाकला.पोलिसांची टीम स्पा सेंटरमध्ये आल्याची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांची मोठी पळापळ झाली आणि गोंधळ निर्माण झाला. या भीतीपोटी एका महिलेने आणि स्पाच्या मॅनेजरने इमारतीच्या खिडकीतून खाली उडी मारली.

महिलेचा जागीच मृत्यू, मॅनेजरची प्रकृती चिंताजनक


इमारतीच्या उंचावरून खाली पडल्यामुळे संबंधित महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर,मॅनेजर या अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अद्याप मृत महिला आणि जखमी मॅनेजरची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिसांनी कडक नजर ठेवली आहे. परंतु,या कारवाई दरम्यान घडलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणामुळे पोलीस प्रशासनासमोर आता तपासाचे नवीन आव्हान उभे राहिले आहे.
Comments
Add Comment

Pune news : पुणेकरांच्या खिशाला झळ! रिक्षा भाडेवाढीसह ई-रिक्षा आणि शेअर रिक्षेबाबत मोठे निर्णय

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत पुणे शहर आणि परिसरातील वाहतुकीशी संबंधित अनेक महत्त्वाचे

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची तडकाफडकी बदली

- अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अहवालानंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास

Gadchiroli : गडचिरोली सर्पदंश प्रकरणात संबंधित आश्रम शाळेचा परवाना रद्द

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश; राज्यातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची त्रयस्थ संस्थेमार्फत तपासणी

Maharashtra Rain : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; पुढील 3 तासांसाठी हवामान विभागाचा इशारा

मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra Rain) काही भागांमध्ये आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने

Jalgaon : स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी ? जळगावात महावितरणकडून दोघांविरोधात गुन्हे दाखल

Jalgaon : स्मार्ट मीटरमुळे थकबाकीपोटी वीजपुरवठा आपोआप खंडित होत असतानाही अनधिकृतपणे वीज जोडणी करून वीज वापर

Jalgaon : रेल्वे प्रवाशांना लुबाडणाऱ्या विक्रेत्यांना दणका ! भुसावळ विभागाची मोठी कारवाई

Jalgaon : रेल्वे स्थानकांवर (Railway Station) प्रवाशांकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ आणि पेयांसाठी निर्धारित दरापेक्षा