BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांना थेट जोडणाऱ्या मुंबई मेट्रो लाईन 2B प्रकल्पातील अत्यंत गुंतागुंतीचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या कामाला आता अधिक गती मिळणार आहे.


MMRDA ने कुर्ला येथील हलाव पुलावर दोन प्रचंड आकाराचे ‘यू-गर्डर’ अचूकरीत्या स्थापित केले. या कामात सर्वात मोठे आव्हान म्हणजे उंचीची मर्यादा होती. विमानतळ प्राधिकरणाच्या निर्बंधांमुळे मेट्रो मार्ग आणि पुलामधील अंतर कमी होते. अशा परिस्थितीत सुमारे २० मीटर लांबीचे गर्डर उचलून बसवणे ही मोठी तांत्रिक कसोटी ठरली. ५०० मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनच्या साहाय्याने हे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर वीजपुरवठा, सिग्नलिंग आणि संप्रेषण यंत्रणांची उभारणी केली जाणार आहे.


वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हे संपूर्ण काम पहाटेच्या सुमारास पार पडले. अवजड वाहनांसाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आला होता, तर हलक्या वाहनांना नियंत्रित प्रवेश देण्यात आला. त्यामुळे नागरिकांना कमीत कमी अडचण झाली.



प्रवाशांसाठी मोठा बदल


ही मेट्रो लाईन DN नगर, वांद्रे–कुर्ला संकुल, कुर्ला, चेंबूर आणि मंडाले या प्रमुख भागांना जोडणार आहे. रोज लाखो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी कमी होण्यासोबतच रस्त्यावरील वाहनांचा ताणही कमी होण्याची अपेक्षा आहे.



लवकरच मेट्रोची चाचणी धाव?


या महत्त्वाच्या टप्प्यानंतर संपूर्ण मार्गावरील काम अधिक वेगाने पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्व तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर मेट्रो सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. BKC परिसरातील वाहतूक व्यवस्थेत यामुळे मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत.

Comments
Add Comment

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :