लिंक्डइन स्किल्स ऑन द राइज २०२६ च्या मते, एआय अँड ऑटोमेशन, डेटा अँड अॅनालिटिक्स, आयटी अँड सायबरसिक्युरिटी, बिझनेस अँड ग्रोथ आणि पीपल अँड लीडरशीप ही कौशल्ये तुम्हाला स्पर्धात्मक राहण्यास मदत करतील
अनेक तरूण प्रोफेशनल्ससाठी रोजगार शोधण्यामधील सर्वात आव्हानात्मक बाब म्हणजे त्यांना पुढे काय शिकावे हे माहित नसते. नवीन लिंक्डइन (LinkedIn) डेटानुसार, भारतातील ३८ टक्के नोकरीसाधक म्हणतात की त्यांना तंत्रज्ञानामुळे आजच्या भूमिकांसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांमध्ये होत असलेल्या बदलांसाठी तयार नसल्यासारखे वाटते. उमेदवारांना त्यांच्या रोजगारक्षमतेला अधिक निपुण करणाऱ्या बाबीवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करण्यासाठी लिंक्डइनचा स्किल्स ऑन द राइज २०२६ अहवाल कंपन्या व उद्योगांमध्ये पाच झपाट्याने विकसित होत असलेल्या कौशल्यांना निदर्शनास आणतो. ही पाच कौशल्ये आहेत एआय अँड ऑटोमेशन, डेटा अँड अॅनालिटिक्स, आयटी अँड सायबरसिक्युरिटी, बिझनेस अँड ग्रोथ आणि पीपल अँड लीडरशीप.
लिंक्डइन डेटामधून निदर्शनास येते की, जगभरातील ४६ टक्के रिक्रूटर्स आता भूमिकांसाठी नियुक्ती करताना कौशल्यांसंदर्भात असलेल्या डेटावर अवलंबून आहेत. पण, भारतातील ७४ टक्के रिक्रूटर्स म्हणतात की पात्र टॅलेंटचा शोध घेणे पूर्वीपेक्षा अधिक आव्हानात्मक बनले आहे. एआय टूल्ससह काम करू शकणाऱ्या, स्पष्टीकरण देऊ शकणाऱ्या व डेटाचा वापर करू शकणाऱ्या, डिजिटल यंत्रणा समजून घेऊ शकणाऱ्या आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवू शकणाऱ्या प्रोफेशनल्सला उद्योगामध्ये मोठी मागणी दिसून येत आहे. पण फक्त टेक्निकल क्षमता महत्त्वाची राहिलेली नाही. टीम्स अधिक क्रॉस-फंक्शनल व एआय-सक्षम होत असताना सहयोग, भागधारक व्यवस्थापन आणि प्रकल्प नेतृत्व ही कर्मचारी कौशल्ये म्हणून उदयास येत आहेत, जी टेक्निकल ज्ञानाला विकासात्मक परिणामामध्ये बदलतात.
लिंक्डइन करिअर तज्ञ आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादिका निरजिता बॅनर्जी (Nirajita Banerjee, LinkedIn Career Expert and India Senior Managing Editor) म्हणाल्या, ''वर्षानुवर्षे तरूण प्रोफेशनल्सला विशेषीकृत असण्यास सांगण्यात आले. पण, २०२६ मध्ये हा नियम बदलत आहे. आज उमेदवारांना फक्त विशेषज्ञ म्हणून नाही तर कौशल्यांचे भांडार म्हणून ओळखले जात आहे. त्यांना एआयसह काम करण्याची पद्धत माहित आहे, तसेच ते डेटाबाबत अंदाज लावू शकतात, काम करण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा करू शकतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टीम्समध्ये सहयोग करू शकतात. या सर्व संयोजनामधून अनुकूलता दिसून येते. झपाट्याने बदलत असलेल्या रोजगार बाजारपेठेत हीच अनुकूलता तुम्हाला रोजगारासाठी नियुक्ती व बढती देते. तुम्हाला या बाजारपेठेत तुमची रोजगारक्षमता वाढवायची असेल तर वेगळ्या कौशल्यांचा पाठलाग करणे थांबवा, तुमचे स्वत:चे अद्वितीय कौशल्य घडवा आणि त्यामध्ये स्पर्धात्मकता वाढवा.''
एआय अँड ऑटोमेशन: उत्पादकता नवीन पाया आहे
दैनंदिन कामकाजामध्ये एआयला एकीकृत करू शकणारे प्रोफेशनल्स गतीशील विकास व वाढ देण्यासाठी उत्तमरित्या सज्ज आहेत. वर्कफ्लो ऑटोमेशन, एलएलएमऑप्स, ऑटोएमएल आणि एपीआय इंटीग्रेशन यांसारखी कौशल्ये इंजीनिअरिंग व आयटीमध्ये लोकप्रिय आहेत, तरीदेखील आज एचआर, विपणन, विक्री व कन्सल्टिंगमध्ये प्रामुख्याने प्रॉम्प्ट इंजीनिअरिंग कौशल्य आढळून येत आहे, ज्यामधून निदर्शनास येते की एआय निपुणता मुलभूत व्यवसाय कार्यसंचालनांमध्ये एकीकृत होत आहे.
डेटा अँड अॅनालिटिक्स: माहितीला प्रत्यक्ष कृतीत आणले पाहिजे
नियोक्ते माहिती मिळवत, स्पष्टपणे संवाद साधत आणि निर्णय घेण्यामध्ये माहितीचा वापर करत प्रत्यक्ष विश्लेषणाला उपयोजनामध्ये आणण्याची क्षमता असलेल्या प्रोफेशनल्सना प्राधान्य देत आहेत. डेटा क्षमता इंजीनिअरिंग कार्यामध्ये स्पष्टपणे दिसून येते आहे, जेथे क्वेरिंग मुलभूत कौशल्य म्हणून उदयास येत आहे. आयटीमध्ये डेटा स्टोरीटेलिंगला सर्वाधिक मागणी दिसण्यात येत आहे. डेटा-संचालित निर्णय घेण्याची क्षमता देखील व्यवसाय विकास, विक्री, कन्सल्टिंग, एचआर, शिक्षण व विपणन अशा मुलभूत नसलेल्या तंत्रज्ञान कार्यांमध्ये मुलभूत कौशल्य बनत आहे.
आयटी अँड सायबरसिक्युरिटी: विकासासह स्थिरतेची गरज
डिजिटल कार्यसंचालन वाढत असताना तंत्रज्ञान वातावरण सुरक्षित करू शकणारे, देखरेख ठेवू शकणारे आणि शक्तिशाली करू शकणारे प्रोफेशनल्स शाश्वत विकासासाठी आवश्यक बनत आहेत. इंजीनिअरिंग व माहिती तंत्रज्ञान कार्यांमध्ये सायबरसिक्युरिटी महत्त्वाचे आहे, तर कन्सल्टिंग भूमिकांमध्ये क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर कौशल्याला प्राधान्य मिळत आहे, जे उद्योगाच्या डिजिटल परिवर्तनाला साह्य करते. याव्यतिरिक्त कंपन्या एआय व क्लाऊड प्लॅटफॉर्म्सचा वापर वाढवत असताना आयटी ऑटोमेशन, इन्सिडण्ट मॅनेजमेंट, रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि थ्रेट डिटेक्शन यांसारख्या कौशल्यांमधून यंत्रणा स्थिरतेवरील वाढता भर दिसून येतो.
बिझनेस अँड ग्रोथ: कार्यक्षमता स्पर्धात्मक फायद्याला चालना देते
नियोक्ते काम करण्याच्या पद्धतींमध्ये सुधारणा करण्यासोबत विकासाला चालना देऊ शकणाऱ्या प्रोफेशनल्सना प्राधान्य देत आहेत. व्यवसाय विकास व विक्रीमध्ये रिलेशनशिप मॅनेजमेंटला वाढती मागणी दिसून येते आहे, तर महसूलसंदर्भात भूमिकांमध्ये नेगोशिएन मुलभूत क्षमता आहे. व्यवसाय विकास, विक्री, इंजीनिअरिंग, माहिती तंत्रज्ञान, कन्सल्टिंग आणि फायनान्स कार्यांमध्ये प्रोसेस ऑप्टिमायझेशन कौशल्य उदयास येत आहे, ज्यामधून ऑपरेशनल कार्यक्षमतेमधील मोठा बदल दिसून येतो. विपणन, आर्ट्स व डिझाइन, शिक्षण आणि व्यवसाय विकास यांमध्ये देखील व्हिज्युअल स्टोरीटेलिंगला प्राधान्य मिळत आहे.
पीपल अँड लीडरशीप: सहयोगामुळे व्यवसायाचा अनुकूल परिणाम वाढतो
व्यवसाय विकास, विक्री, इंजीनिअरिंग, शिक्षण, आर्ट्स व डिझाइन, माहिती तंत्रज्ञान, कन्सल्टिंग, एचआर, फायनान्स व विपणनामध्ये सतत सहयोग दिसून येत आहे. अशा व्यापक रोजगार कार्यांमधून टीम्सच्या कार्यसंचालन पद्धतींमधील मोठा बदल दिसून येतो. आज काम अधिक एआय-सक्षम व क्रॉस-फंक्शनल होत असताना कर्मचाऱ्यांशी जुडले जाण्याची, गुंतागुंतीचे व्यवस्थापन करण्याची आणि सहयोगाने निष्पत्ती देण्याची क्षमता रोजगारासंदर्भात महत्त्वपूर्ण फायदा बनत आहे.
प्रोफेशनल्स ही मागणीमध्ये असलेली कौशल्ये आत्मसात करण्यास मदत करण्यासाठी लिंक्डइनने ३१ मार्च २०२६ पर्यंत निवडक लिंक्डइन लर्निंग कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिले आहेत, ज्यामध्ये AI agents for every day professionals, learning data analytics, stakeholder management for leaders and managers अशा कोर्सेसचा समावेश आहे.
यंदाच्या द राइज इन इंडियामधील ५ स्किल्स ग्रुप्स:
1. एआय अँड ऑटोमेशन
a. प्रॉम्प्ट इंजीनिअरिंग
b. वर्कफ्लो ऑटोमेशन
c. लार्ज लँग्वेज मॉडेल ऑपरेशन्स (एलएलएमऑप्स)
d. ऑटोमेटेड मशिन लर्निंग (ऑटोएमएल)
e. अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय)
2. डेटा अँड अॅनालिटिक्स
a. क्वेरिंग
b. डेटाबेस ऑप्टिमायझेशन
c. डेटा अॅनालिसिस
d. डेटा स्टोरीटेलिंग
e. डेटा एथिक्स
3. आयटी अँड सायबरसिक्युरिटी
a. क्लाऊड इन्फ्रास्ट्रक्चर
b. आयटी ऑटोमेशन
c. इन्सिडण्ट मॅनेजमेंट
d. रिअल-टाइम मॉनिटरिंग
e. थ्रेट डिटेक्शन
4. बिझनेस अँड ग्रोथ
a. रिलेशनशिप मॅनेजमेंट
b. जीटीएम अँड ग्रोथ स्ट्रॅटेजी
c. ऑपरेशनल एफिशिएन्सी (किंवा प्रोसेस ऑप्टिमायझेशन)
d. नेगोशिएशन
e. व्हिज्युअल स्टोरीटेलिंग अँड कम्युनिकेशन
5. पीपल अँड लीडरशीप
a. कोलॅबोरेशन
b. टीम मॅनेजमेंट
c. स्टेकहोल्डर मॅनेजमेंट
d. बजेट मॅनेजमेंट
e. प्रोजेक्ट मॅनेजमेंट
लिंक्डइनच्या करिअर तज्ञ निराजिता बॅनर्जी प्रोफेशनल्सना नवीन संधींचा फायदा घेण्यास मदत करण्यासाठी टिप्स सांगत आहेत:
● तुमच्यामधील कौशल्यांकडे व्यापक दृष्टिकोनामधून पहा: तुम्ही आत्मसात केलेल्या कौशल्यांची यादी तयार करा. काम करण्यापासून स्वयंसेवेपर्यंत प्रत्येक गोष्टीचा विचार करा. मानवी कौशल्यांना प्राधान्य दिले जात असल्यामुळे तुमच्यामध्ये तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक कौशल्ये असू शकतात. तुम्हाला वाटत असेल की, तुमच्यामध्ये मागणीमध्ये असलेली कौशल्ये किंवा तुम्हाला ज्या भूमिकेमध्ये/क्षेत्रात जायचे आहे तेथे आवश्यक असलेली कौशल्ये नाहीत, तर ती कौशल्ये आत्मसात करण्याचे नियोजन करा.
● शीर्षकांना नाही तर कौशल्ये आत्मसात करण्याला प्राधान्य द्या : हायरिंग मॅनेजरच्या गरजांशी तुमची कौशल्ये जुळणाऱ्या भूमिकांसाठी अर्ज केल्यास तुमची निवड होण्याची शक्यता वाढते. लिंक्डइनच्या AI-powered job search चा वापर करत तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टींबाबत स्पष्टपणे लिहा आणि प्रत्येक पोस्टिंगवरील job match वैशिष्ट्य तपासा, ज्यामुळे तुम्ही त्या कामासाठी पात्र आहात की नाही हे त्वरित समजते.
● कौशल्यांबाबत फक्त सांगू नका, तर सिद्ध करून दाखवा: कौशल्यांची फक्त यादी न करता कौशल्यांचा वापर कसा करता याचा देखील उल्लेख करा. हायर्सना तुमच्यामधील कौशल्ये व अनुभव समजण्यासाठी तुम्ही कौशल्यांचा कशाप्रकारे वापर करता, तुम्ही निर्माण केलेला प्रभाव आणि तुम्ही संपादित केलेले निकाल यांचे तुमचे लिंक्डइन प्रोफाइल आणि रिझ्यूमवर स्पष्टपणे वर्णन करा.
● परिपूर्ण प्रोफाइलसह संधी मिळवा: तुमचा प्रोफाइल अपडेटेड ठेवा, रिक्रूटर्सना स्पष्टपणे दिसतील अशा किमान पाच संबंधित कौशल्यांचा उल्लेख करा. लिंक्डइनच्या एआय-समर्थित राइटिंग सजेशन्सचा वापर करत लक्षवेधक हेडलाइन, अबाऊट व एक्स्पीरिअन्स सेक्शन्स तयार करा. स्वत:चा फोटो टाकणे आणि तुमच्या माहितीचे सत्यापन करणे यामुळे तुमच्याबाबत लवकर विश्वास निर्माण होण्यास मदत होते आणि हायर्सना तुम्हाला शोधणे सोपे जाते.