‘माया’च्या कथेला नवी उंची देणारे ‘मन गाईना सुरात’ गाणे प्रदर्शित!

‘माया’ या चित्रपटातील ‘मन गाईना सुरात’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून, ते संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. आयुष्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा संदेश देणारे हे गाणे ऐकताना एक वेगळीच ऊर्जा जाणवते.


‘मन गाईना सुरात’ या गाण्याचे सुंदर शब्द आणि सुरेल धून यामुळे हे गाणे प्रेक्षकांना भावत आहे. या गाण्यातील दृश्यांमध्येही प्रकाश, रंग आणि हसरे क्षण यांची सुंदर सांगड घालत प्रसन्न वातावरण निर्माण करण्यात आले आहे. या गाण्याला अंजली मराठे हिचा सुरेल आवाज लाभला असून वैभव जोशी यांचे शब्द लाभले आहेत. तसेच पार्थ उमराणी यांचे भावपूर्ण संगीत या गाण्यात अधिकच रंगत आणते. दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, “ मनाचे विविध विभ्रम, संभ्रम दाखवणारे ‘मन गाईना सुरात’ हे गाणे चित्रपटातील अव्यक्त भावना सुरेलपणे व्यक्त करते."


निर्माते नितीन वैद्य म्हणतात, ‘माया’मधील ‘मन गाईना सुरात’ प्रेक्षकांना सकारात्मक ऊर्जा देईल. कथानकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर येणारे हे गाणे चित्रपटाचा चित्रपटाच्या कथेला आकार देते. साधे, शांत संगीत आणि भावना यामुळे हे गाणे प्रेक्षकांच्या आवडेल याची मला खात्री आहे. शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे निर्माते डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य आहेत. आदित्य इंगळे दिग्दर्शित ‘माया’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, मुक्ता बर्वे, गिरीश ओक, विजय केंकरे आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या व्यक्तिरेखा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभ्या असलेल्या माणसांच्या भावविश्वाचे प्रभावी प्रतिनिधित्व करतात.

Comments
Add Comment

संवेदनशील आठवणींची 'पंढरीची वारी'

राजरंग-राज चिंचणकर पंढरीच्या रायाशी संबंधित अनेक कलाकृती विविध माध्यमांतून आतापर्यंत सादर झाल्या आहेत. रूपेरी

आषाढीच्या महिन्यात पंढरपूर अप्रतिम

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  सावळ्याची जणू सावली’ या झी मराठी चॅनेलच्या मालिकेतील सावलीची भूमिका साकारून

शेंगा, रानभाजी आणि बरंच काही...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद  काही वर्षांपूर्वी गजेंद्र अहिरेंचं शेवग्याच्या शेंगा नावाचं, संजय मोने आणि स्वाती

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती

  टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल    मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामध्ये अश्वत्थामाचा ज्वलंत जीवनपट

एका रंगकर्मीची 'विठ्ठल वारी'...

राजरंग-राज चिंचणकर   पंढरीच्या वारीत असंख्य वारकरी सामील होत आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन होतात. या

उजळमाथ्याने फिरणाऱ्या प्रत्येक गॉसिपकारास...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद   नाटक उजळवणाऱ्या प्रत्येक प्रकाशयोजनाकारास मी नेहमी पहिलं वाक्य ऐकवतो, "रिस्पेक्ट