आला ‘माझा पुरस्कार’...

राजरंग : राज चिंचणकर


तमाम नाट्यरसिक आणि नाट्यसृष्टीशी संबंधित मंडळी ज्या पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत असतात, तो 'माझा पुरस्कार' आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. नाट्यसृष्टीतले 'शुभ्र व्यक्तिमत्त्व' म्हणजेच ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यव्यवस्थापक अशोक मुळ्ये यांचा हा पुरस्कार कायम चर्चेत असतो. याचे कारण म्हणजे केवळ 'त्यांना वाट्टेल त्यांनाच' ते हा पुरस्कार बहाल करत असतात. तर यंदाचा त्यांचा 'माझा पुरस्कार' सोहळा त२४ फेब्रुवारी रोजी रंगणार आहे. त्यांचा स्वघोषित असा हा 'माझा पुरस्कार' नाट्यसृष्टीत दबदबा राखून आहे. सालाबादप्रमाणे यंदाही या पुरस्कार सोहळ्याचा घाट त्यांनी 'त्यांच्या पद्धतीने' घातला आहे. या पुरस्काराचे हे विसावे वर्षं असल्याचे समजते आणि तो देणारे अशोक मुळ्ये यांनी वयाची ऐंशी पार केली आहे. पण त्यांच्या उत्साहात काडीमात्रही फरक पडलेला नाही.


"हा पुरस्कार मी देतो म्हणून तो माझा पुरस्कार", हे अशोक मुळ्ये यांचे ब्रीदवाक्य आहे. त्यांच्या शुभ्र पेहरावाप्रमाणेच त्यांच्या या पुरस्काराची ट्रॉफी सुद्धा पांढरी शुभ्र असते. त्यांना वाट्टेल त्यांनाच ते हा पुरस्कार देतात आणि त्यांनी त्यांच्या स्वभावाधर्मानुसार यंदाचे पुरस्कार जाहीर करून टाकले आहेत. अर्थात, फक्त आणि फक्त अशोक मुळ्ये यांच्या दृष्टिकोनातूनच, नाट्यसृष्टीत यंदा ज्यांनी भरीव कार्य केले आहे, त्यांनाच ते हा पुरस्कार देत असतात आणि यात विशेष काही नसल्याचे त्यांना पूर्ण ओळखून असलेल्यांना माहीत आहे. साहजिकच, या निमित्ताने ते आता कुणावर बरसणार आणि कुणाला स्वतःच्या खिशात घालणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

Comments
Add Comment

संवेदनशील आठवणींची 'पंढरीची वारी'

राजरंग-राज चिंचणकर पंढरीच्या रायाशी संबंधित अनेक कलाकृती विविध माध्यमांतून आतापर्यंत सादर झाल्या आहेत. रूपेरी

आषाढीच्या महिन्यात पंढरपूर अप्रतिम

टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल  सावळ्याची जणू सावली’ या झी मराठी चॅनेलच्या मालिकेतील सावलीची भूमिका साकारून

शेंगा, रानभाजी आणि बरंच काही...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद  काही वर्षांपूर्वी गजेंद्र अहिरेंचं शेवग्याच्या शेंगा नावाचं, संजय मोने आणि स्वाती

‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामुळे वेगळीच अनुभूती

  टर्निंग पॉइंट-युवराज अवसरमल    मी अश्वत्थामा चिरंजीव’ नाटकामध्ये अश्वत्थामाचा ज्वलंत जीवनपट

एका रंगकर्मीची 'विठ्ठल वारी'...

राजरंग-राज चिंचणकर   पंढरीच्या वारीत असंख्य वारकरी सामील होत आषाढी एकादशीला विठुरायाच्या चरणी लीन होतात. या

उजळमाथ्याने फिरणाऱ्या प्रत्येक गॉसिपकारास...!

भालचंद्र कुबल-पाचवा वेद   नाटक उजळवणाऱ्या प्रत्येक प्रकाशयोजनाकारास मी नेहमी पहिलं वाक्य ऐकवतो, "रिस्पेक्ट