प्रतिष्ठेचा ‘इंका अवॉर्ड्स’ १५ व १६ एप्रिल रोजी मुंबईत

मुंबई : इंडियन नॅशनल सिने अकॅडमी अवॉर्ड्स (INCA Awards) यांच्या पहिल्या पर्वाची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, हा भव्य सोहळा १५ आणि १६ एप्रिल रोजी मुंबईत  संपन्न होणार आहे.



भारतामधील १२ प्रमुख चित्रपट उद्योगांना एका समान व्यासपीठावर आणणारा ‘इंका’ हा देशातील पहिला राष्ट्रीय चित्रपट अकॅडमी मंच आहे. भाषाभेद, प्रांतिक सीमारेषेच्या चौकटी ओलांडून, भारतीय सिनेमाची व्यापकता, वैविध्य आणि जागतिक स्तरावरील महत्त्व यांचा एकत्रित व समतोल सन्मान करण्याचा हा दूरदृष्टीपूर्ण स्तुत्य उपक्रम आहे. भारतीय चित्रपटसृष्टीच्या सांस्कृतिक एकात्मतेला संस्थात्मक स्वरूप देणारा हा उपक्रम अतिशय  महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.



‘इंका’ची संकल्पना सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL) आणि साउथ इंडियन इंटरनॅशनल मूव्ही अवॉर्ड्स (SIIMA) संबंधित उपक्रमांचे संस्थापक व मार्गदर्शक यांच्या संकल्पनेतून साकारली असून, या उपक्रमाचे नेतृत्व विष्णू वर्धन इंदुरी करत आहेत. प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडिया (Producers Guild of India)  हे या उपक्रमाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे ‘इंका’ला संस्थात्मक विश्वासार्हता, व्यापक दृष्टी आणि जागतिक स्तरावरील अकॅडमींच्या तोडीचा दर्जा प्राप्त झाला आहे. पहिल्या ‘इंका अवॉर्ड्स’चे प्रस्तुत प्रायोजक म्हणून कल्याण ज्वेलर्स सहभागी झाले आहेत. उत्कृष्टता, परंपरा आणि विश्वास या समान मूल्यांवर आधारित ही भागीदारी ‘इंका’च्या भव्यतेला अधिक बळ देणारी ठरणार आहे.



‘इंका’ची रचना अकॅडमी-शैलीतील सन्मान प्रणालीवर आधारित असून, पारदर्शकता, तज्ज्ञांकडून मान्यता आणि विश्वसनीयता हा याचा गाभा आहे. १२ भारतीय भाषांतील प्रत्येक चित्रपट उद्योगासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या प्रमुख पुरस्कारांचा समावेश असेल. तसेच दिग्दर्शन, अभिनय, संगीत, तांत्रिक कौशल्य आणि पदार्पण अशा विविध राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांद्वारे प्रांतिक अभिमान आणि राष्ट्रीय उत्कृष्टतेचा सन्मान केला जाईल.



२०२५ वर्षात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांसाठी ‘इंका’तर्फे निर्माते आणि दिग्दर्शकांना अधिकृत प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन करण्यात आले  आहे.



•पात्रता: १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान प्रदर्शित मराठी चित्रपट



•अंतिम दिनांक: १ मार्च २०२६



•नोंदणी संकेतस्थळ: www.INCA.in



‘इंका’ हा केवळ पुरस्कार सोहळा नाही; तो भारतीय चित्रपटसृष्टीच्या एकात्मिक सांस्कृतिक अभिव्यक्तीचा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
Comments
Add Comment

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला

युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा

हास्यजत्रा फेम इशा डे हिचा नवरा आहे तरी कोण? वाचा सविस्तर

मुंबई : लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री इशा डे हिने

कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा आणि फरमान यांच्या लग्नावर वडिलांचा गंभीर आरोप; त्यांनी माझ्या डोळ्यासमोर...

मुंबई: कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले सध्या तिच्या आंतरधर्मीय लग्नामुळे चर्चेत आहे. मल्याळम

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी, शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

मुंबई : गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत

‘घबाडकुंड’ चित्रपट ठरणार मराठीतला पहिला युनिव्हर्स

मुंबई : हॉलिवूड आणि बॉलिवूडमध्ये गाजलेल्या चित्रपटांच्या ‘युनिव्हर्स’ संकल्पनेची आता मराठी चित्रपटसृष्टीतही