किया सेल्‍टोसने ६ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा गाठला

मुंबई : किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकरने जाहीर केले की, सेल्‍टोसने २०१९ मध्‍ये लाँच झाल्‍यापासून भारतात एकूण ६ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा पार केला आहे. या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून व्‍हेरिएण्‍ट्सप्रती ग्राहकांची, तसेच बाजारपेठांमध्‍ये शाश्वत स्‍वीकृती दिसून येते, ज्‍यासह हे मॉडेल मिड-एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये सर्वाधिक सातत्‍यपूर्ण परफॉर्मर ठरले आहे.


सुरूवातीपासून सेल्‍टोसने स्‍पष्‍ट उत्‍पादन तत्त्वासह बाजारपेठेत प्रवेश केला. या वेईकलमध्‍ये विशिष्‍ट जागतिक डिझाइन, विविध पॉवरट्रेन पर्याय, तसेच पेट्रोल व डिझेल पर्याय, इंधन प्रकारांमध्‍ये ऑटोमॅटिक ट्रान्‍समिशन्‍स, मोठ्या स्‍वरूपातील इन्‍फोटेन्‍मेंट असलेली वैशिष्‍ट्य-संपन्‍न केबिन, कनेक्‍टेड कार तंत्रज्ञान आणि प्रीमियम इंटीरिअर फिनिशेस् आहेत. श्रेणीमध्‍ये मोठ्या प्रमाणात उपयुक्‍ततेला प्राधान्‍य दिले जात असताना सेल्‍टोसने केबिनमधील उत्‍सावहर्धक अनुभव, तंत्रज्ञान एकीकरण आणि व्हिज्‍युअल आकर्षकता यांवर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केले.


सुरक्षितता आणि तंत्रज्ञानाने स्‍वीकृतीला चालना देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावली. यशस्‍वी अपडेट्ससह मॉडेलने आपल्‍या ऑफरिंग वाढवत अॅडवान्‍स्‍ड ड्रायव्‍हर असिस्‍टण्‍स सिस्‍टम्‍स (एडीएएस), सुधारित कनेक्‍टीव्‍हीटी सोल्‍यूशन्‍स आणि व्‍यापक सेफ्टी पॅकेजची भर केली. टॉप ट्रिम्‍सकडून सतत देण्‍यात आलेल्‍या २९ टक्‍के योगदानामधून निदर्शनास येते की, ग्राहक मोठ्या प्रमाणात उच्‍च स्‍तरीय सुरक्षितता, आरामदायीपणा व डिजिटल एकीकरणाचा अवलंब करत आहेत. तसेच एण्‍ट्री व मिड व्‍हेरिएण्‍ट्सप्रती स्थिर मागणीमधून मॉडेलचे संतुलित मूल्‍य तत्त्व दिसून येते.


सेल्‍टोसने विशेषत: उच्‍च श्रेणींमध्‍ये असलेली वैशिष्‍ट्ये अपल्‍या किमतीच्‍या मर्यादेत उपलब्‍ध करून देत ग्राहकांच्‍या अपेक्षा वाढवल्‍या. यामुळे ग्राहकांना हॅचबॅक्‍स, सेदान्‍स व कॉम्‍पॅक्ट एसयूव्‍हींवरून अपग्रेड करत अधिक प्रीमियम मालकीहक्‍क अनुभवाचा आनंद घेता आला, ज्‍यासाठी त्‍यांना मोठ्या श्रेणीतील वेईकल खरेदी करण्‍याची गरज भासली नाही. सेल्‍टोसच्‍या व्‍यापक व्‍हेरिएण्‍ट ट्रिम्‍समुळे मूल्‍याला व वैशिष्‍ट्यांना महत्त्व देणाऱ्या ग्राहकांसाठी ही वेईकल अनुकूल ठरली.


या महत्त्‍वपूर्ण टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्‍त करत किया इंडियाचे चीफ सेल्‍स ऑफिसर सनहॅक पार्क म्‍हणाले , ''६ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा गाठण्‍यामधून डिझाइन, सुरक्षितता, तंत्रज्ञान व कार्यक्षमतेमध्‍ये प्रबळ तत्त्वे देणाऱ्या उत्‍पादनासाठी ग्राहकांची स्थिर पसंती दिसून येते. सेल्‍टोसने लाँचच्‍या वेळी उपलब्‍ध नसलेली वैशिष्‍ट्ये व कॉन्फिग्‍युरेशन्‍स देत मिड-एसयूव्‍ही श्रेणीमध्‍ये अपेक्षा वाढवल्‍या. व्‍हेरिएण्‍ट्समध्‍ये सतत सुधारणा, तसेच टॉप ट्रिम्‍ससाठी प्रबळ मागणीमधून प्रगत सुरक्षा यंत्रणा व कनेक्‍टेड तंत्रज्ञानांमध्‍ये ग्राहकांचा वाढता आत्‍मविश्वास दिसून येतो.''


नेक्‍स्‍ट-जनरेशन सेल्‍टोस प्रबळ वारसा आणि ग्राहक विश्वासाला अधिक दृढ करते, तसेच कियाचे मुलभूत उत्‍पादन आधारस्‍तंभ मोठी उपस्थिती, आकर्षक डिझाइन आणि प्रगतीशील सुरक्षितता व तंत्रज्ञानाला अधिक प्रगत करते. श्रेणीमधील आघडीची ४,४६० मिमी लांबी, १,८३० मिमी रूंदी आणि २,६९० मिमी लांब व्‍हीलबेससह ही वेईकल आतील बाजूस एैसपैस जागा आणि रस्‍त्‍यावर लक्षवेधक उपस्थिती देते. नवीन सेल्‍टोसमध्‍ये अद्वितीय आरामदायीपणा, विस्‍तारित डिजिटल इंटरफेस, अपग्रेडेड एडीएएस सूट आणि सुधारित सेफ्टी आर्किटेक्‍चर आहे. केबिनमध्‍ये सुधारणा आणि एकीकृत करण्‍यात आलेली वैशिष्‍ट्ये वेईकलच्‍या दैनंदिन उपयुक्‍ततेला अधिक वाढवतात, तसेच ग्राहक महत्त्व देणाऱ्या विविध पॉवरट्रेन व ट्रान्‍समिशन संयोजनांना कायम ठेवण्‍यात आले आहे.


किया इंडिया विकासाच्‍या भावी टप्‍प्‍याच्‍या दिशेने वाटचाल करत असताना सेल्‍टोस सुस्‍पष्‍ट, सर्वांगीण मूल्‍य तत्त्व देत कंपनीच्‍या मिड-एसयूव्‍ही धोरणाला दिशा देत आहे. ६ लाख युनिट्स विक्रीच्‍या टप्‍प्‍यामधून वेईकलप्रती शाश्वत स्‍वीकृती दिसून येते. यासह अपग्रेडेड मॉडेल विमान ग्राहकांमध्‍ये, तसेच व्‍यावहारिकता व महत्त्‍वाकांक्षी एसयूव्‍हीचा शोध घेत असलेल्‍या नवीन ग्राहकांमध्‍ये देखील नवीन मागणीला चालना देण्‍यास सज्‍ज आहे.

Comments
Add Comment

Operation White Hammer : आंध्र प्रदेशात ४७ कोटींचे अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

सिंथेटिक ड्रग्जच्या बेकायदेशीर उत्पादनाविरोधात महत्त्वपूर्ण कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय)

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Dhurandhar : रि-रिलीजच्या सिरीजमध्ये रणवीरच्या धुरंधरची एन्ट्री; या दिवशी होणार रिलीज

रणवीर सिंहच्या धुरंधर चित्रपटाची अजूनही फॅन्समध्ये जबरदस्त क्रेझ असून लवकरच धुरंधर 2 प्रेक्षकांच्या भेटीला

युद्धामुळे अडकलेली लारा दत्ता मुलीसह भारतात परतली; सांगितला थरारक अनुभव

मुंबई : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत त्या काळात लारा

हास्यजत्रा फेम इशा डे हिचा नवरा आहे तरी कोण? वाचा सविस्तर

मुंबई : लोकप्रिय कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री इशा डे हिने

सरपंच-उपसरपंचांची जुगलबंदी, शशांक शेंडे आणि ओंकार भोजने आमने-सामने

मुंबई : गावच्या राजकारणात सरपंच आणि उपसरपंच यांच्यातील नोक-झोक नेहमीच चर्चेचा विषय ठरते. आता ही रंगत