राज्यात शुक्रवारपासून सुरू होणार दहावीची परीक्षा, १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला बसणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने (MSBSHSE) घेतली जाणारी दहावीची परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी २०२६ पासून म्हणजेच उद्यापासून सुरू होत आहे. यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी राज्यात १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. परीक्षा शुक्रवार २० फेब्रुवारी पासून होईल. शेवटचा पेपर बुधवार १८ मार्च २०२०६ रोजी आहे.


दहावीची परीक्षा पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाईल. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ८ लाख ६५ हजार ७४० मुलगे तर ७ लाख ४९ हजार ७३६ मुली आणि १३ तृतीयपंथी आहेत. यंदाच्या दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक मंडळाच्या वेबसाईटवर १५ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधून नोंदणी पूर्ण झाली आहे आणि राज्यभरातील ५११९ केंद्रांवर परीक्षा घेतली जाईल.




  • UDISE+ डेटाबेस वापरून ऑनलाइन अर्ज

  • १० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज स्वीकारले

  • महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये पुरेसे अंतर

  • मदत पुरवण्यासाठी २० समुपदेशकांची नियुक्ती

  • नियंत्रण कक्ष आणि हेल्पलाईन सुविधा


परीक्षेदरम्यान संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी, मंडळाने राज्यभरात २७१ भरारी पथके तयार केली आहेत. विभागीय स्तरावर विशेष भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. मंडळ सदस्यांना आणि जिल्हास्तरीय सरकारी अधिकाऱ्यांना परीक्षा केंद्रांना अचानक भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत . सीसीटीव्हीने सुसज्ज असलेल्या केंद्रांवरील परीक्षा कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली घेतल्या जातील.


परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आपापल्या परीक्षा केंद्रांवर नियोजीत परीक्षा सुरू होण्याच्या ३० मिनिटे आधी म्हणजेच सकाळी साडेदहा वाजता आणि दुपारी अडीच वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. हॉल तिकिटे शाळेच्या लॉगिनद्वारे ऑनलाइन उपलब्ध आहेत. परीक्षेसाठी अतिरिक्त १० मिनिटे दिली जातील. विशेष दिव्यांग उमेदवारांसाठी सवलती आहेत. जर काही जण वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणांमुळे विहित कालावधीत प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यांकन किंवा समकक्ष परीक्षांना उपस्थित राहू शकले नाहीत, तर त्यांना २०, २३ आणि २४ मार्च रोजी उपस्थित राहण्याची संधी दिली जाईल.


राज्य परिवहन (एसटी बस सेवा) आणि महावितरण कंपनी (वीज वितरण कंपनी) यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवण्यासाठी मंडळाशी समन्वय ठेवणार आहे.


मुंबईतील परीक्षा केंद्रे: १००४


मुंबईतील परीक्षा केंद्र प्रमुख: १००४


मुंबईतील संरक्षक: ७१


मुंबईतील धावपटू (रनर): १००४


मुंबईतील पर्यवेक्षक: १३,९३७


मुंबईतील स्थिर पथके: ८


मुंबईतील फ्लाइंग स्क्वॉड्स: २१


मुंबईतील संवेदनशील केंद्रे: १


मुंबईतील बंद केंद्रे: ५


मुंबईतील समुपदेशकांचे फोन नंबर


९९६०६४४४११
७९७२५७३७४२
९८३४०८४५९
३ ९३५९९
७८३१५ ८१६९२०२२१४
९३७१६६१२५५
७२०८४२
९३८१ ७७०९१५६०६८
८४२११५०५२८
९४०४७८३९९६

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश  २०० कोटींच्या दंड

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :