cooperative complex: छत्रपती संभाजीनगर येथे प्रशस्त सहकार संकुलाची निर्मिती करा; डॉ. पंकज भोयर यांनी दिले निर्देश

मुंबई: छत्रपती संभाजीनगर विभागीय ठिकाण असल्यामुळे सहकार विभागाची अनेक कार्यालये शहरात आहेत. नागरिकांच्या व सहकारी संस्थांच्या सभासदांच्या सोयीसाठी ही संपूर्ण कार्यालये एकाच छताखाली आणणे गरजेचे आहे. त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे सहकार संकुलाच्या सोईसुविधा युक्त प्रशस्त इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, असे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.


बैठकीला अतिरिक्त आयुक्त नागनाथ इगलेवार, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय सहनिबंधक संतोष बिडवाई, जिल्हा उपनिबंधक समृत जाधव, जागतिक बँक प्रकल्प अंतर्गत कार्यरत कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी आदी उपस्थित होते.



सहकार राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले:


सहकार संकुलाची स्थापत्य विषयक कामे पूर्ण करण्यासाठी गती वाढवावी. या इमारतीमध्ये कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांना विविध सोयी सवलती असतील, याची खात्री करावी. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची काम पूर्ण करण्यात यावी.


संबंधित कंत्राटदाराने विहित काल मर्यादित काम पूर्ण करावे. काम पूर्ण करण्यामध्ये विलंब लागल्यास खर्च वाढतो. त्यामुळे यंत्रणेने कंत्राटदाराकडून काम पूर्ण करण्यासाठी दक्षता घ्यावी. कामाला विलंब झाल्यास कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देशही राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी दिले.



असे आहे सहकार संकुल:


सहकार संकुलामध्ये प्रशासकीय इमारत तळमजला अधिक सात माळ्यांची असून एकूण बांधकाम क्षेत्रफळ १८,५२४ चौरस मीटर आहे. तसेच निवासी इमारतही सात माळ्यांची आहे. संकुलामध्ये पार्किंगची प्रशस्त व्यवस्था, दिव्यांग बांधवांसाठी रॅम्प, चार लिफ्ट, अतिथी गृह, भोजनकक्ष असणार आहे.


या सहकार संकुलात जिल्हा उपनिबंधक, विशेष लेखा परीक्षक वर्ग दोन, सुनावणी हॉल, नोंदणी कक्ष, भांडार कक्ष, कार्यालयीन कर्मचारी कक्ष, विभागीय सहनिबंधक कार्यालय, विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (फिरते पथक), तालुका उपनिबंधक, विशेष लेखापरीक्षक वर्ग दोन (सहकारी संस्था), प्रादेशिक सहसंचालक (साखर), प्रथम विशेष लेखापरीक्षक वर्ग एक (साखर), द्वितीय विशेष लेखापरीक्षक (साखर), विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (बँक), सहकार न्यायालय, विशेष लेखापरीक्षक (दुग्ध), विशेष लेखा परीक्षक (कापूस)आदी कार्यालये तसेच प्रशिक्षण सभागृह आहे.

Comments
Add Comment

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत

PM Modi and Sukhbir Singh Badal Meeting : पंतप्रधान मोदी आणि सुखबीर सिंग बादल यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष (भाजप)

PM Modi : काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे, तृणमूल आणि उबाठाच्या बंडखोर खासदारांना पंतप्रधानांचे आश्वासन

नवी दिल्ली: संसदेत सुरू असलेल्या गदारोळादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या