Cotton Procurement Scheme: मुख्यमंत्र्यांकडून कापूस खरेदी योजनेला मुदतवाढ; खुल्या बाजारात दर कोसळण्याची भीती

अकोला: शेतकऱ्यांच्या प्रश्नांना सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार रणधीर सावरकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे कापूस खरेदी योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे कापूस हंगाम २०२५-२६ च्या खरेदीस एप्रिल २०२६ अखेर पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.


अकोला जिल्हा व राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये ३५ लाख कापूस उत्पादक शेतकरी आहेत. विशेषतः पश्चिम विदर्भात कापूस वेचणी एप्रिल-मे महिन्यांत सुरू होते, परंतु यावर्षी कापसाची विक्री अधूरी राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक त्रास होण्याची भीती होती. सीसीआयने कापूस खरेदीसाठी अंतिम मुदत २७ फेब्रुवारी २०२६ निश्चित केली होती, मात्र लांबलेला वेचणी हंगाम लक्षात घेता मुदतवाढ करणे आवश्यक ठरले.


आमदार सावरकरांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तातडीने पाठपुरावा केला. त्यानंतर मुख्यमंत्रींनी केंद्र सरकारकडे थेट मागणी केली आणि सीसीआयला एप्रिल २०२६ अखेरपर्यंत खरेदी प्रक्रिया चालू ठेवण्याचे सुचविले.


शेतकऱ्यांकडून अद्याप कापसाची विक्री पूर्ण न झाल्याने आणि खुल्या बाजारात दर कोसळण्याची भीती लक्षात घेऊन ही पावले घेतली गेली आहेत.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू