Praful Patel : होय, अजित पवारांना निधनाच्या आदल्या दिवशी फोन केला होता! प्रफुल्ल पटेल यांचे स्पष्टीकरण; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर झाले बोलणे

मुंबई : "निधनाच्या आदल्या दिवशी मी अजितदादांना दिल्लीतून फोन केला होता, पण तो शेतकऱ्यांच्या कामासाठी होता. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांना अनेक लोक फोन करत असतात. मी त्यांना कुठल्याही कारणाने थांबवण्याचे काम केलेले नाही. मी दिल्लीत असताना ते नेमके कुठे आहेत, याची मला कल्पना नव्हती," असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी दिले.


माध्यमांशी संवाद साधताना पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. "दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढणे ही पक्षाची जबाबदारी आहे", असे त्यांनी नमूद केले.



'विलीनीकरणाची ही वेळ नाही'


विलीनीकरणाच्या मुद्द्यावर भाष्य करताना पटेल म्हणाले की, "अजितदादांच्या निधनानंतर ही वेळ विलीनीकरणावर चर्चा करण्याची नाही. आज आमचा पक्ष स्वतंत्र आहे. आमची संघटनात्मक पदे किंवा विधिमंडळ नेतृत्वाची रिक्त झालेली जागा भरण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करत आहोत."



विमान कंपनीवर फोडले खापर


अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना प्रफुल पटेल यांनी थेट विमान कंपनीलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. "या दुर्दैवी घटनेत विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे. पायलटकडून काही दुर्लक्ष झाले असेल, तर ते सीबीआय चौकशीत समोर येईलच; मात्र सकृतदर्शनी विमान कंपनी या दुर्घटनेला मोठ्या प्रमाणात जबाबदार असल्याचे मला वाटते," असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल तपासणी होणे आवश्यक असून, राज्य सरकारने सीबीआय चौकशीची शिफारस करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले.



रोहित पवारांच्या आरोपांवर भाष्य टाळले


"पायलटने विमान मुद्दाम खाली पाडले," असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्याबाबत उत्तर देताना पटेल म्हणाले, "मी एक जबाबदार व्यक्ती असून सरकारमधील प्रदीर्घ अनुभवामुळे मी जे काही बोलेन ते तथ्यांच्या आधारेच बोलेन. पुराव्याशिवाय कोणत्याही आरोपांना उत्तर देणे मला योग्य वाटत नाही."

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा