Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा चेहरामोहरा बदलणार; रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय पदभरती प्रक्रिया तातडीने राबविण्याबाबत मंत्री श्री.नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक पार पडली.



या बैठकीस वित्त विभागाचे अप्पर सचिव श्री.तानाजी पवार, कृषी विभागाचे श्री. चंदन शिवे, सामाजिक न्याय विभागाचे सह सचिव श्री. सोमनाथ बागुल, सार्वजनिक आरोग्य विभागाचे श्री. दीपक केंद्रे, महिला व बालविकास विभागाचे सहसचिव श्री.ठाकूर, जलसंधारण विभागाचे सचिव श्री.गणेश पाटील,जलसंधारण विभागाचे सहसचिव श्री.संदीप जाधव यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


यावेळी मंत्री श्री.नितेश राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा व राज्याच्या अर्थव्यवस्थेत मोलाची भर घालणारा जिल्हा आहे. तसेच राज्यातील पहिला AI युक्त जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला ओळख मिळाली असून, नीती आयोगाने सिंधुदुर्गच्या AI मॉडेलची दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी आणि प्रशासन अधिक सक्षम करण्यासाठी सिंधुदुर्गमधील विविध आस्थापनांवरील वरिष्ठ व आवश्यक पदे तातडीने भरण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Xi Jinping : ब्रिक्स परिषदेसाठी शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; ४०० लोकांचे शिष्टमंडळही येणार

बीजिंग : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे