Rajya Sabha Election : राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्चला मतदान केंद्रीय आयोगाकडून घोषणा; महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश

मुंबई : देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, या सर्व ३७ जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, यामध्ये महाराष्ट्रातील ७ जागांचा समावेश आहे.


महाराष्ट्रातून राज्यसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या ७ खासदारांचा कार्यकाळ २ एप्रिल २०२६ रोजी संपत आहे. निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये शरद पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, डॉ. भागवत कराड, प्रियांका चतुर्वेदी, रजनी पाटील, डॉ. फौजिया खान आणि धैर्यशील पाटील या नेत्यांचा समावेश आहे.


राज्यातील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी (मविआ) अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. विधानसभेत भाजपकडे १३२, शिवसेनेकडे ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) ४१ असे महायुतीचे भक्कम संख्याबळ आहे. याउलट, उबाठा गटाकडे २०, काँग्रेसकडे १६ आणि शरद पवार गटाकडे केवळ १० आमदार आहेत. या आकडेवारीनुसार, महायुती सातपैकी सहा जागा सहज जिंकू शकते. उरलेल्या एका जागेसाठी महाविकास आघाडीला आपल्या तिन्ही घटक पक्षांची मते एकवटून मोठी कसरत करावी लागणार आहे.




निवडणूक कार्यक्रम असा...


- अधिसूचना जारी होणे :२६ फेब्रुवारी २०२६
- अर्ज भरण्याची अंतिम मुदत : ५ मार्च २०२६
- अर्जांची छाननी : ६ मार्च २०२६
- अर्ज मागे घेण्याची मुदत : ९ मार्च २०२६
- मतदान व मतमोजणी : १६ मार्च २०२६ (सकाळी ९ ते ४ मतदान; सायंकाळी ५ वाजता मतमोजणी)


शरद पवार पुन्हा रिंगणात?


निवृत्त होणाऱ्या खासदारांमध्ये प्रियांका चतुर्वेदी (उबाठा) आणि रजनी पाटील (काँग्रेस) यांच्या पुनर्निवडीवर टांगती तलवार आहे, कारण त्यांच्या पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नाही. अशा स्थितीत ६० वर्षांहून अधिक काळाचा संसदीय अनुभव असलेले शरद पवार यांनी पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. मविआतील मित्रपक्ष आपल्या जागांचा त्याग करून पवार यांच्या नावावर एकमत करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जर मविआत समन्वयाचा अभाव राहिला, तर महायुती या निवडणुकीतही 'क्लीन स्वीप' देईल, असे बोलले जात आहे.

कुठे किती जागांसाठी निवडणूक


महाराष्ट्रासह इतर ९ राज्यांमध्येही राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये तामिळनाडू (६), पश्चिम बंगाल (५), बिहार (५), ओदिशा (४), आसाम (३), हरियाणा (२), छत्तीसगड (२), तेलंगणा (२) आणि हिमाचल प्रदेश (१) या राज्यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा