विवेक भीमनवार यांनी घेतली एमपीएससीच्या अध्यक्षपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली असून, बुधवारी त्यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. राजभवन येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना शपथ दिली.


या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रिक्त झालेल्या या घटनादत्त स्वायत्त संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता भीमनवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.


सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भीमनवार यांची ही नियुक्ती पदभार स्वीकारल्यापासून सहा वर्षांसाठी किंवा त्यांच्या वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत (यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत) असेल. दरम्यान, भीमनवार यांनी कार्यभार स्वीकारेपर्यंत आयोगाचे सदस्य डॉ. अभय वाघ यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.


राज्य सरकारच्या विविध संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्याचे मोठे आव्हान आता नवनियुक्त अध्यक्षांसमोर असणार आहे. त्यांच्या प्रदीर्घ प्रशासकीय अनुभवाचा फायदा आयोगाच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



कोण आहेत विवेक भीमनवार?


 

विवेक भीमनवार हे २००९ च्या बॅचचे 'महाराष्ट्र कॅडर'चे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी एलएलबी आणि एमएससी या पदव्या संपादन केल्या आहेत. एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते राज्याचे परिवहन आयुक्त म्हणून कार्यरत होते. परिवहन आयुक्त असताना त्यांनी मुंबई महानगर प्रदेशातील बेकायदेशीर 'बाईक टॅक्सी' सेवांविरुद्ध कठोर मोहीम उघडली होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांची प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती.

Comments
Add Comment

MPSC कडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; उमेदवारांना मोठा दिलासा

अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी मिळाली नवी मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व

Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या;सर्वसामान्यांसाठी मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करा - उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

म्हाडाच्या लॉटरीत प्रतिसाद न मिळणाऱ्या घरांची 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर विक्री करा;पुणे, शिरूर,

Shetkari Karjmafi update : कर्जमाफी योजनेत १ लाख ४० हजार शेतकरी अपात्र; प्राप्तिकर आणि अन्य कारणांनी वगळल्याची सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

१६ लाख ९६ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात दोन दिवसांत निधी जमा होणार मुंबई : राज्य सरकारने घोषित केलेल्या 'पुण्यश्लोक

Tuljabhavani Temple Land Case : तुळजाभवानीच्या १,६६८ हेक्टर जमिनींच्या कथित घोटाळ्यावर समिती आक्रमक; 'तातडीने ताबा घ्या, नाहीतर कोर्टात भेटू!'

पुणे : श्री तुळजाभवानी देवस्थानच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील

Devendra Fadnavis : गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा मुंबई

Road Accident : घाटात मोठा अपघात, ब्रेक फेल झाला आणि ट्रकने SUV चिरडली; तीन वाहनांचे प्रचंड नुकसान

गडचिरोली : कोरची - कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावर बेडगाव घाटात बुधवारी (५ ऑगस्ट २०२६) सकाळी साडेअकराच्या सुमारास