नाशिक मनपाच्या स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड

नाशिक : नाशिक महापालिकेच्या सर्व स्थायी समिती सदस्यांची बिनविरोध निवड झाली. पक्षांच्या गटनेत्यांनी सुचवलेली नावे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांना सादर करण्यात आली. जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार असल्यामुळे सदस्यांची निवड बिनविरोध करण्यात आली. महापौरांनी निवड झालेल्या सदस्यांच्या घोषणेची औपचारिकता केली आणि स्थायी समितीवर नव्या सदस्यांचे स्वागत केले.


महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी निवड झालेल्या सदस्यांच्या नावांची घोषणा केली. या घोषणेनुसार नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीवर भारतीय जनता पक्षाच्या अर्थात भाजपच्या नऊ जणांची तर शिवसेनेच्या चार जणांची, उबाठाच्या दोन जणांची आणि राष्ट्रवादीच्या एकाची निवड झाली आहे. अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे यांना राष्ट्रवादीकडून संधी मिळाली आहे तर मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांना शिवसेनेकडून स्थायी समितीवर संधी मिळाली आहे.


नाशिक महापालिका स्थायी समिती सदस्य




  1. भाजप : माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदूबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप

  2. शिवसेना : मयुरी पवार (मनसे), किरण गामने, राहुल दिवे, रंजना बोराडे

  3. राष्ट्रवादी काँग्रेस : मुकेश शहाणे (अपक्ष)

  4. उबाठा : योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे

  5. मनसेच्या मयुरी पवार यांनी शिवसेना नगरसेवकांसोबत नोंदणी केल्यामुळे त्यांना सत्ताधारी गटाकडून संधी मिळाली आहे.

Comments
Add Comment

मुंबईसह ठाणे लोकसभेची खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी; शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

William Langford : मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा रहस्यमयी मृत्यू, खोलीत आढळला मृतदेह

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएल २०२६ निमित्त भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट

IPL 2026 : हंगामातील चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

मुंबई : आयपीएल २०२६ च्या चौथ्या सामन्यात मंगळवारी (३१ मार्च) पंजाब किंग्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा

Mumbai Local Mega block Update : मुंबईत अचानक 'इतक्या' लोकल फेऱ्या झाल्या रद्द, आता शेवटचीही गाडी सुटणार 'या' वेळेवर

मुंबई : मुंबईत सध्या लोकलचे वेळापत्रक हे बिघडलेलं दिसत आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत आणि बऱ्याच गाड्या