IPL 2026 : हंगामातील चौथ्या सामन्यात पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

मुंबई : आयपीएल २०२६ च्या चौथ्या सामन्यात मंगळवारी (३१ मार्च) पंजाब किंग्सचा सामना गुजरात टायटन्सशी होईल. हा सामना मुल्लानपूर येथील महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंत पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकूण सहा सामने खेळले गेले आहेत. यापैकी पंजाब किंग्सने तीन, तर गुजरातने तीन सामने जिंकले आहेत.


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाबने गेल्या हंगामात अंतिम फेरी गाठली होती. पण, विजेतेपदाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) कडून संघाला पराभव सहन लागला होता. या हंगामातही पंजाबचा संघ खूप मजबूत दिसत आहे. पंजाब पुन्हा एकदा प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग या सलामीच्या जोडीकडून दमदार कामगिरीची अपेक्षा करत आहे. तर कर्णधार श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसेल. अय्यरने गेल्या हंगामात शानदार फलंदाजी करत १७ सामन्यांमध्ये १७५ च्या स्ट्राईक रेटने ६०४ धावा केल्या होत्या.


पंजाब किंग्सला नेहल वाढेरा आणि शशांक सिंग यांच्याकडूनही दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. आयपीएल २०२५ मध्ये नेहल चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता, त्याने १६ सामन्यांमध्ये १४५ च्या स्ट्राईक रेटने ३६९ धावा केल्या होत्या. मार्कस स्टोइनिस, मार्को जानसेन आणि उमरझाई फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देतील. दरम्यान, मिचेल ओवेन आणि कूपर कॉनोली आयपीएल २०२६ मध्ये प्रभावी कामगिरी करून आपली छाप पाडण्याचा प्रयत्न करतील.


दुसरीकडे, गुजरात टायटन्सला या हंगामात साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांच्याकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. सुदर्शन गेल्या हंगामात १५ सामन्यांमध्ये ७५९ धावा करून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता, तर गिलने ६५० धावा केल्या होत्या. मात्र, जोस बटलरचा अलीकडील फॉर्म संघासाठी निश्चितच चिंतेचा विषय असेल.


ग्लेन फिलिप्सच्या कामगिरीवरही बारकाईने लक्ष ठेवले जाईल. वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर आणि राहुल तेवतिया फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीद्वारे संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा आणि ल्यूक वूड यांच्या उपस्थितीमुळे संघाचा वेगवान गोलंदाजीचा मारा मजबूत दिसतो. दरम्यान, राशिद खान फिरकी विभागाचे नेतृत्व करेल, त्याला साई किशोर आणि सुंदर यांची साथ मिळणार आहे.



संभाव्य प्लेइंग XI :


पंजाब किंग्स : प्रबसिमरन सिंग (विकेटकीप), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमातुल्ला ओमरझाई, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, झेवियर बार्टलेट, युझवेंद्र चहल


गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, जेसन होल्डर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा

Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो