William Langford : मुंबई इंडियन्सच्या मॅचनंतर BCCI च्या ब्रँड कास्ट इंजिनिअरचा रहस्यमयी मृत्यू, खोलीत आढळला मृतदेह

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध ट्रायडन्ट हॉटेलमध्ये आयपीएल २०२६ निमित्त भारतात आलेल्या बीसीसीआयच्या ब्रॉडकास्ट इंजिनिअरचा संशयास्पद मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यान विल्यम लेग्नफोर्ड असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मूळचे ब्रिटिश नागरिक होते.


माहितीनुसार, यान लेग्नफोर्ड हे २४ मार्चपासून आयपीएल हंगामासाठी मुंबईत वास्तव्यास होते. २९ मार्च रोजी वानखेडे स्टेडियम येथे झालेल्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यासाठी ते उपस्थित होते.


सामना संपल्यानंतर ते आपल्या हॉटेलमधील २७१५ क्रमांकाच्या खोलीत परतले. मात्र, ३० मार्च रोजी सकाळी रिसेप्शनमधून वारंवार फोन करूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी मास्टर कीच्या साहाय्याने दरवाजा उघडला असता, यान लेग्नफोर्ड हे खोलीत खाली पडलेल्या अवस्थेत आढळून आले.


तत्काळ हॉटेलच्या डॉक्टरांना पाचारण करण्यात आले, मात्र त्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नेमकं मृत्यूचं कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम

Dwayne Bravo No. 47 retired : ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून ड्वेन ब्राव्होची ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त

नवी दिल्ली : ट्रिनबागो नाइट रायडर्स (टीकेआर) संघाने ड्वेन ब्राव्होची प्रतिष्ठित ४७ क्रमांकाची जर्सी निवृत्त