मुंबईसह ठाणे लोकसभेची खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंवर जबाबदारी; शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदारसंघांच्या संपर्कप्रमुखांची घोषणा

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबईत सहा लोकसभा मतदार संघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भिवंडी व कल्याण लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदी खासदार नरेश म्हस्केंची निवड करण्यात आली आहे.


शिवसेनेकडून राज्यातील सर्व लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई या मुंबईतील सर्व सहा लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुख पदाची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे. खासदार डॉ. शिंदेंसोबत मंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यावर मुंबईच्या लोकसभा मतदार संघांची जबाबदारी असेल. तसेच ठाणे लोकसभेचे संपर्कप्रमुखपद देखील खासदार डॉ. शिंदेंकडे सोपवण्यात आले आहे, असे पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.



लोकसभा मतदार संघनिहाय संपर्कप्रमुख


१) मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, ईशान्य मुंबई व दक्षिण मुंबई – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
२) ठाणे – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
३) भिवंडी व कल्याण – खासदार नरेश म्हस्के
४) नंदुरबार - माजी आमदार शिरीष चौधरी
५) धुळे व दिंडोरी - शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी
६) जळगाव - आमदार दिलीप लांडे
७) रावेर - आमदार तुकाराम काते
८) बुलढाणा - संजय सोनार
९) अकोला - माजी आमदार राजन साळवी
१०) अमरावती - आमदार किशोर अप्पा पाटील
११) वर्धा - आमदार डॉ. मनीषा कायंदे
१२) रामटेक - अनिल कोकीळ
१३) नागपूर - माजी खासदार संजय निरुपम
१४) भंडारा-गोंदिया - विलास चावरी
१५) गडचिरोली- चिमूर - माजी मंत्री जगदीश गुप्ता
१६) चंद्रपूर - आमदार कृपाल तुमाने
१७) यवतमाळ - वाशिम - शिवसेना उपनेत्या प्रिती बंड
१८) हिंगोली - शिवसेना उपनेते आनंदराव जाधव
१९) नांदेड - दत्ता दळवी
२०) परभणी - भास्कर आंबेकर
२१) जालना – खासदार संदिपान भुमरे
२२) छत्रपती संभाजी नगर - विलास पारकर
२३) नाशिक – आमदार सुहास कांदे
२४) पालघर – पांडुरंग पाटील
२५) रायगड - अनिल नवघरे
२६) कोल्हापूर, मावळ व पुणे लोकसभा - मंत्री उदय सामंत
२७) बारामती – किरण लांडगे
२८) शिरुर – आमदार शरद सोनवणे
२९) अहिल्यानगर – शिवसेना सचिव राम रेपाळे
३०) शिर्डी – खासदार डॉ. ज्योती वाघमारे
३१) बीड – मनोज शिंदे
३२) धाराशिव – माजी खासदार उन्मेष पाटील
३३) लातूर – मंगेश कुडाळकर
३४) सोलापूर – खासदार धैर्यशील माने
३५) माढा – चंद्रहार पाटील
३६) सांगली – योगेश जानकर
३७) सातारा – शरद कणसे
३८) रत्नागिरी – राजेश मोरे, नगरसेवक
३९) सिंधूदुर्ग – बाळा चिंदरकर
४०) हातकणंगले – आमदार सुहास बाबर

Comments
Add Comment

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

PA's daughter : रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक अजित दशावतारे

Prakash Abitkar : राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर, विद्युत आणि इमारत सुरक्षा ऑडिट; आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी सर्व शासकीय, खासगी आणि धर्मादाय

Khelo India : खेलो इंडिया संवादातून १,६०० ठिकाणांवरील ८ लाखांहून अधिक युवकांशी संवाद

· महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात संवाद कार्यक्रम · पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार संबोधित मुंबई : हॉकीपटू मेजर

Nitesh Rane : राज्यातील सागरी विकास प्रकल्पांना प्राधान्याने मंजुरी द्या!

- मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट - गेटवे ऑफ इंडियावरील प्रवासी शुल्क