Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत. मंगळवारी, नालंदा जिल्ह्यातील दिपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माघरा गावातील शीतला मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. पूजेदरम्यान गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरी झाली. घटनेची माहिती मिळताच, दीपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले.



मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर


मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले. तसेच मुख्य सचिवांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आणि नुकसान भरपाईची घोषणाही केली.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुख्य सचिवांना चौकशीचे निर्देश देण्यात आले असून, पाटणा आयुक्तांना घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. नुकसान भरपाईची घोषणाही करण्यात आली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येकी ४ लाख रुपये आणि मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, पीएमएनआरएफतर्फे प्रत्येक मृताच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची सानुग्रह रक्कमही दिली जाईल.



पंतप्रधान मोदींकडूनही दुःख व्यक्त


पंतप्रधान मोदींनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, "बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील अपघात अत्यंत दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याप्रती मी माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो." पीएमएनआरएफमधून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना ५० हजार रुपये दिले जातील.


शीतला मंदिरात ही चेंगराचेंगरी झाली, ते बिहार शरीफमधील नालंदा जिल्ह्यातील माघरा येथे आहे. मंगळवारी, माघरा येथील शीतला मंदिरात हजारो लोक दर्शनासाठी जमले होते. दरवर्षी अशी गर्दी जमते, पण असा अपघात यापूर्वी कधीही घडला नव्हता. पोलीस आता या चेंगराचेंगरीचा आणि त्यामागे काही कट आहे का याचा तपास करत आहेत. मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे अशक्य आहे.

Comments
Add Comment

Kiren Rijiju Statement on Amit Shah : 'ज्या दिवशी अमित शाह उत्तर देतील, ते तुम्हाला ऐकताही येणार नाही!' किरेन रिजिजूंचा विरोधकांवर हल्लाबोल

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षांच्या जोरदार गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही

Redmi Note 17 5G Launched : Redmi Note 17 5G भारतात लाँच; ८०००mAh ची तगडी बॅटरी अन् ५०MP कॅमेरा, पाहा किमतीसह सर्व फीचर्स!

नवी दिल्ली : प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी शाओमीने (Xiaomi) आपल्या लोकप्रिय रेडमी नोट सिरीजचा विस्तार करत भारतीय बाजारात

Kochi Flight Emergency Door News : कोचीमध्ये विमानाचे इमर्जन्सी डोअर उघडण्याचा प्रयत्न; प्रवाशांमध्ये घबराट, केरळमधील तरुणाला अटक!

कोची : मलेशियाची राजधानी कुआलालंपूरहून केरळच्या कोची शहराकडे येणाऱ्या विमानात बुधवारी रात्री एका प्रवाशाच्या

IRCTC Japan Tour Package : IRCTC ची भन्नाट ऑफर : दिल्ली ते जपान १० दिवसांची मस्त सफर; टोकियो, ओसाका अन् हिरोशिमा फिरण्याची संधी!

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची उपकंपनी असलेल्या 'इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन'ने (IRCTC) परदेशात

Assam Crime News : आसाम हादरले! १६ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; विटांनी ठेचून अत्यंत निघृण हत्या

हैलाकांडी : ईशान्य भारतातील आसाम (Assam) राज्यामधून एका अत्यंत भयानक आणि सुन्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून

AAI Apprentice Recruitment 2026: विमानतळावर नोकरीचं स्वप्न पूर्ण होणार! भारतीय विमानतळ प्राधिकरणात अप्रेंटिस भरती जाहीर; 'या' तारखेपूर्वी करा अर्ज

मुंबई : विमान वाहतूक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने