Weather Alert: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: राज्यातील हवामानात बदल जाणवायला सुरुवात झाली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावर पोहोचताच हवामानात पुन्हा एकदा लक्षणीय बदल जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि हवामानाच्या अद्ययावत माहितीकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


कोकण किनारपट्टीत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबदार आणि दमट हवामान असणार आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेची जाणीव अधिक तीव्र होईल . कमाल तापमान ३४ ते ३६ अंशांच्या आसपास आहे, तर किमान तापमान २२ ते २४ अंशांदरम्यान आहे. किनारपट्टी भागात आर्द्रता जास्त असल्याने उकाडा जाणवेल.


आज पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर भागात हवामान कोरडे राहील. येथे कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांदरम्यान आहे, तर किमान तापमान १६ ते १९ अंशांदरम्यान नोंदवले जात आहे. सकाळी हलका गारवा असला तरी दुपारी वातावरण उबदार असेल.


गेले काही दिवस मराठवाडा आणि विदर्भ विभागात स्वच्छ आकाश आणि कोरडे हवामान आहे. आजही या भागातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, गोंदिया, चंद्रपूर तसेच छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी आदी भागात कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांदरम्यान पोहोचले आहे. किमान तापमान १८ ते २२ अंशांदरम्यान आहे. दुपारच्या वेळेत उष्णतेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे.


एकंदरीत १५ फेब्रुवारी रोजी राज्यात तापमान वाढीचा कल कायम आहे. आकाश स्वच्छ, पावसाचा अभाव आणि थंड वाऱ्यांचा प्रभाव कमी झाल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. पुढील काही दिवसांतही राज्यात कोरडे आणि उबदार हवामान कायम राहील आणि हिवाळ्याचा प्रभाव आणखी कमी होत जाईल. यासोबत कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही हवामान विभागाने उष्णता वाढणार असल्याचे सांगितले आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : MPSC पेपरफुटी प्रकरणावरून नवनाथ बन यांचा रोहित पवारांवर निशाणा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणावरून भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस

MPSC Paper Leak : 'एमपीएससी' पेपरफुटीप्रकरणात भाजप-शरद पवार गटात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षा पेपरफुटी पेपरफुटीप्रकरणात भाजप

Jalgaon : हदयद्रावक ! झोका घेताना चिमुकल्याच्या गळ्याला दोरीचा फास लागला अन् क्षणात होण्याचं नव्हतं झालं

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद (Nashirabad) येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. घरातील झोपाळ्यावर खेळताना झोक्याच्या

Sunetra Pawar : पिंपळवंडी पीडित कुटुंबाच्या मदतीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; भावंडांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी

पिंपळवंडी येथील पीडित कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा

Local Body Member Appointments : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

- ग्रामविकास विभागामार्फत अध्यादेश जारी; पंचायत समितीला २० टक्के, तर जिल्हा परिषदेसाठी १० टक्के कोटा

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ९ आणि ११ सप्टेंबरला धावणार 'मोदी एक्सप्रेस'

- गणेश भक्तांच्या सेवेसाठी गेल्या १४ वर्षांपासून उपक्रम; दादर रेल्वे स्थानकातून रेल्वे होणार मार्गस्थ मुंबई :