रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले

चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने विजेच्या खांबाच्या आधाराने गळफास घेतला. ही धक्कादायक घटना राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यातल्या भांदक येथे रेल्वेच्या हद्दीत घडली. रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळ १८ वर्षांच्या दुर्गेश प्रसाद मसरामने विजेच्या खांबाच्या आधाराने गळफास घेतला.


दुर्गेश मूळचा मध्य प्रदेशमधील कोको येथील रहिवासी होता. तो कुटुंबासह मोलमजुरीसाठी भांदक येथे आला होता. पण ऐन तारुण्यात दुर्गेशने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजलेले नाही. दुर्गेशच्या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रावती रेल्वे स्थानक परिसरात वर्धा-बल्लारशाह रेल्वे मार्ग आणि सायडिंगचे काम प्रगतीपथावर आहे. या कामासाठी आलेल्या मजुरांची वस्ती याच परिसरात आहे. दुर्गेश त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह याच भागात वास्तव्यास होता.


पहाटेच्या सुमारास दुर्गेश घरात नसल्याचे कुटुंबातील इतर सदस्यांच्या लक्षात आले. त्यांनी शोधाशोध सुरू केली. ही शोधाशोध सुरू असताना रेल्वे पोलिसांना रेल्वे गेट क्रमांक ३६ जवळील एका वीज खांबाला लटकून तरुणाने आत्महत्या केल्याचे समजले. घटनास्थळी पोलीस आणि दुर्गेशच्या कुटुंबातील सदस्य पोहोचले तेव्हा दुर्गेशने आत्महत्या केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर