कांजूरमार्ग येथे पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामासाठी ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेने शनिवारी आणि रविवारी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या कांजूर रेल्वे पादचारी उड्डाणपूलाच्या गर्डर लाँचिगसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषणा करण्यात आली आहे. या पॉवरब्लॉकमुळे मध्य रेल्वेवर काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी रेल्वे प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.



मध्य रेल्वेद्वारे कांजूरमार्ग रेल्वे स्थानक येथे कल्याण बाजूच्या दिशेने कि.मी. २४/१३–१४ दरम्यान पादचारी उड्डाणपुलासाठी ६ मीटर रुंदीचे ४ गर्डर, रोड क्रेनच्या सहाय्याने लाँच करण्यात येणार आहे. यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. मध्य रेल्वेकडून शनिवार १४ ते रविवार १५ फेब्रुवारी २०२६ च्या मध्यरात्रीपर्यंत विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.


या ब्लॉकमुळे १५ फेब्रुवारी २०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता कर्जतसाठी सुटणारी गाडी माटुंगा रेल्वे स्थानक ते मुलुंड रेल्वे स्थानक दरम्यान डाउन जलद मार्गावरून वळविण्यात येईल. ही लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर येथे थांबणार नाही. त्यामुळे तिन्ही स्टेशनवर उतरणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या स्टेशनवर उतरावे लागणार आहे.


ब्लॉकमुळे उपनगरीय गाड्यांवरील परिणाम होणार आहे. या ब्लॉकमुळे दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १५ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाण्यासाठी ००.२४ वाजता सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच १५ फेब्रुवारी २०२६ रोजी ठाण्यातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी ०४.०४ वाजताची गाडी रद्द करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील सर्वच स्कायवॉकवर उभारणार सरकते जिने; स्थायी समिती सदस्यांनी केली मागणी

मुंबई: बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकवर सरकता जिना बांधला जाणार असून अशाप्रकारे

मुंबईतील फेरीवाल्यांच्या धोरणाबाबत शुक्रवारी होणार निर्णय; महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत प्रशासनाला दिले जाणार निर्देश

मुंबई: मुंबईत राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्याच्यादृष्टीकोनातून पात्र फेरीवाल्यांना बसण्यास जागा निश्चित

सार्वजनिक शौचालयांमध्ये महिलांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ?

मुंबई: मुंबईतील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या महिलांकडून सार्वजनिक शौचालय वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या

घाटकोपरमधील मराठी तरुणीला कंपनीतल्या लोकांनी दिला त्रास; काम सोडल्यावरही..., अखेर मनसेने दाखवला इंगा

मुंबई: मराठी माणसांना प्रवासादरम्यान किंवा एखाद्या कंपनीच्या कार्यालयात परप्रांतीय लोकांनी त्रास दिल्यास

मुंबई महापालिकेचे दवाखाने अष्टौप्रहर सुरु ठेवा; स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे निर्देश

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सुरु असलेले दवाखाने विशिष्ट वेळेतच सुरु असतात.

कमला मिलमध्ये महापालिकेची न भूतो, न भविष्यती कारवाई; डॉ अश्विनी जोशी यांनी अशक्य गोष्ट केली शक्य

मुंबई: मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी चाबूक हाती घेताच याच्या महसूल