घाटकोपरमधील मराठी तरुणीला कंपनीतल्या लोकांनी दिला त्रास; काम सोडल्यावरही..., अखेर मनसेने दाखवला इंगा

मुंबई: मराठी माणसांना प्रवासादरम्यान किंवा एखाद्या कंपनीच्या कार्यालयात परप्रांतीय लोकांनी त्रास दिल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते त्यांना चांगलाच इंगा दाखवतात. मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून होणारे वादही मनसे स्टाईलने सोडवले जात असल्याचं पाहायला मिळतं. घाटकोपर येथील मराठी तरुणीलाही मनसेनं मदत केल्याचं समोर आलं आहे. अश्विनी घाडगे असं या मराठी मुलीचं नाव आहे.



नेमकं घडलं काय?


मिळालेल्या माहितीनुसार,घाटकोपरमधील सेराब्रस कन्सल्टिंग (Cerabrus Consulting) नावाच्या कंपनीकडून मराठी तरुणी अश्विनी घाडगेला ३ महिन्यांचा पगार देण्यात आला नव्हता. कंपनीचे लोक अश्विनीला त्रास द्यायचे. त्यानंतर तिने नोकरी सोडून दिल्यावर तिचा तीन महिन्यांचा पगार थकवण्यात आला.


तरुणीसह कुटुंबीयांनी मानले राज ठाकरेंचे आभार
कंपनीच्या मालकांनी पगार थकवल्याने मनसेनं ठिय्या आंदोलन केलं. वारंवार पाठपुरावा करूनही कंपनीकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने कुटुंबीयांनी मनसेकडे धाव घेतली. मनसेच्या ठिय्या आंदोलनानंतर अश्विनीच्या खात्यात पगार जमा झाला. त्यानंतर अश्विनी आणि तिच्या कुटुंबीयांनी राज ठाकरे यांचे आभार मानले.

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update : पुढील चार दिवसांसाठी विजांचा कडकडाट आणि काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यासाठी पुढील चार दिवसांचा हवामानाचा अंदाज जाहीर केला असून,

BMC News : पदपथांवरील सर्व अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवर फिरणार जेसीबी

- कोणतीही अनधिकृत बांधकामे होणार नाहीत अधिकृत - महापालिका आयुक्तांचे सर्व सहायक आयुक्तांना कडक निर्देश मुंबई

BMC News : मुंबईत कचऱ्यांच्या संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर, कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्देशांच्या पार्श्वभूमीवर,

Kokan Railway : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! सीएसएमटी ते सावंतवाडी रोड नवी नियमित एक्स्प्रेसला मंजुरी; लवकरच प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

Health Facilities : स्वातंत्र्यदिनी राज्यभरात विक्रमी संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण

मंत्री प्रकाश आबिटकर; ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार मुंबई : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट

Navanath Ban : संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नवनाथ बन यांची टीका; भाजपच्या पत्रकार परिषदेत आरोप-प्रत्यारोप

मुंबई : भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार