मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द


मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येईल. हार्बर मार्गावरील कुर्ला – वाशीदरम्यान ब्लॉक असल्याने प्रवाशांचा प्रवास रखडण्याची शक्यता आहे. तर, मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गिकेवर जलद मार्गावर ब्लॉक असल्याने, सर्व लोकल धीम्या मार्गावर धावतील. त्यामुळे रविवारी प्रवाशांचा प्रवासाचा वेग मंदावण्याची चिन्हे आहेत. खारबाव येथे शनिवारी घेण्यात आलेला नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.



मध्य रेल्वेवर माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सीएसएमटी येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल मुलुंड – माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.


हार्बर मार्गावर कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान सुटणाऱ्या वाशी / बेलापूर / पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन मार्गावरील लोकल, तसेच पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कुर्ला आणि पनवेल – वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


पश्चिम रेल्वे मार्गावर राम मंदिर – बोरिवली रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गिका आणि पाचवी मार्गिका दरम्यान सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बोरिवली – अंधेरीदरम्यान अप जलद मार्गिकेवरील सर्व लोकल सेवा अप धीम्या आणि सहाव्या मार्गिकेवर चालवण्यात येईल. पाचव्या मार्गिकेवरील सर्व लोकल डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. ब्लाॅकमुळे काही अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द असतील. तसेच काही लोकल सेवा हार्बर मार्गावरील गोरेगावपर्यंत चालवण्यात येईल.

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून