मुंबई महापालिकेचे दवाखाने अष्टौप्रहर सुरु ठेवा; स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे निर्देश

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सुरु असलेले दवाखाने विशिष्ट वेळेतच सुरु असतात. त्यामुळे रुग्णांना रात्रीच्या वेळी वैद्यकीय आरोग्य सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे महापालिकेच्यावतीने चालवल्या जाणारे सर्व दवाखाने हे अष्टौप्रहर सुरु ठेवावेत,अशाप्रकारचे निर्देश महापालिका स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाद्वारे दिले आहेत.


मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये सन २०२६-२७चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून या अर्थसंकल्पावर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी भाषण केले. या भाषणामध्ये अध्यक्षांनी, उच्चरक्तदाब, कर्करोग इत्यादी असंसर्गजन्य रोगांसाठी आवश्यक असलेल्या दर्जेदार उपकरणांनी दवाखाने सुसज्ज केले जातील. ही प्रशंसनीय बाब म्हटले आहे. मात्र, महानगरपालिकेचे दवाखाने दिवसातील विशिष्ट वेळेत सुरु असतात. फक्त दिवसा हे दवाखाने सुरु असल्यामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी खाजगी दवाखान्यात जावे लागते. परंतु रात्री १०.३० किंवा ११.०० नंतर खाजगी दवाखानेही बंद होत असल्याने केवळ औषध तथा इंजेक्शन्स यांनी बऱ्या होणाऱ्या औषधांकरताही रुग्णांना नाईलाजाने खाजगी रुग्णालय अथवा महानगरपालिकेच्या रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे रुग्णालयाच्या धर्तीवर महानगरपालिकेचे दवाखानेही अष्टौप्रहर सुरु ठेवावेत. आणि माझ्या या सूचनेची अंमलबजावणी करण्याकरिता प्रशासनाने अनुकूलरित्या विचार करावा,असे निर्देश दिले.


सर्व प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, विशेष रुग्णालये, प्रसुतिगृहांमध्ये रुग्णशय्या उपलब्धतेचा केंद्रीकृत डॅशबोर्ड तयार करावा. त्यामुळे कमीत कमी वेळेत रुग्णांना रुग्णसेवा उपलब्ध होईल. या दृष्टीने प्रशासनाने विचार करावा,अशाही सूचना केल्या.


मुंबई महापालिकेतील अनेक पदे रिक्त असल्याने तसेच काही रद्द करण्यात येत असल्याने महापालिकेच्या कामकाजावर होणाऱ्या परिणामांचा समाचार घेताना स्थायी समिती अध्यक्षांनी पदे रद्द करून महापालिकेच्या विद्यमान कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही. अथवा महापालिकेच्या सेवांवर आणि कार्यक्षमतेवर परिणाम होणार नाही या याची तसेच आवश्यक तिथे पदे भरण्याची दक्षता आयुक्तांनी घ्यायला हवी.

Comments
Add Comment

Ashish Shelar : मुंबईतील शाळांच्या भौतिक सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरा; पालकमंत्री अँड आशिष शेलार यांचे निर्देश

तपासणी अधिकाऱ्यांची 89 पदे रिक्त https://prahaar.in/2026/08/24/why-are-jihadis-who-throw-eggs-at-the-ganesh-procession-even-needed-in-maharashtra-minister-nitesh-rane-asks-angrily/ मुंबई : मुंबई महापालिका

Pune MHADA Lottery 2026 : पुण्यात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची मोठी संधी; म्हाडाकडून ४,४६२ घरांसाठी सोडत जाहीर

पुणे : पुणे आणि आसपासच्या परिसरात स्वतःचे घर घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाच्या पुणे मंडळाने एक अत्यंत

CM Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधी-टाटा ट्रस्टच्या करारातून ‘रूग्णांना’ दिलासा; पहिल्याच करारातून, ८९.६० लाखांची मदत

मुंबई : यकृत प्रत्यारोपण, कर्करोग आणि मेंदूवरील शस्त्रक्रिया यांसारख्या महागड्या उपचारांसाठी मुख्यमंत्री

Vikroli Women Suicide : विक्रोळीत वृध्द महिलेचा इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

मुंबई : मुंबईतील विक्रोळी परिसरात इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 65 वर्षीय

Vile Parle Crime : मुंबईतील संतापजनक घटना! द्रोणाचार्य पुरस्कार विजेत्या शिक्षकाने 16 वर्षीय विद्यार्थींनीला बोलावून घेतलं अन्...

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले परिसरात द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित 48 वर्षीय जिम्नॅस्टिक्स

Bhuleshwar Cha Raja : 'ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती...' भुलेश्वरचा राजा प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासा

मुंबई : मुंबईतील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी भुलेश्वर परिसरात काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली.