अमेरिकेचा नेदरलँडवर ९३ धावांनी विजय

नवी दिल्ली  : आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील २१ वा सामना अमेरिका आणि नेदरलँड्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सैतेजा मुक्कामल्लाने दमदार अर्धशतकी खेळी केली. तर शुभम रांजणेने शेवटी फलंदाजी करताना नाबाद ४८ धावा केल्या. या खेळीच्या बळावर अमेरिकेने ६ गडी बाद १९६ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला. यासह अमेरिकेने हा सामना ९३ धावांनी आपल्या नावावर केला आहे.


या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय फसला. कारण अमेरिकेच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. सलामीला आलेल्या मोनांक पटेलने ३६ धावांची खेळी केली. तर जहागीरने २० धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सैतेजा मुक्कामल्लाने ५१ चेंडूत ७९ धावांची दमदार खेळी केली. तर शेवटी शुभम रांजणेने २४ चेंडूत नाबाद ४८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार खेचले. या खेळीच्या बळावर अमेरिकेने २० षटकांअखेर ६ गडी बाद १९६ धावांचा डोंगर उभारला.


नेदरलँड्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९७ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. मायकल लेव्हिटने अवघ्या ३ धावा केल्या. तर मॅक्स ओ डाऊडने अवघ्या १३ धावा केल्या. तर बस डी लीडने २३ धावा केल्या. कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने जोर लावला. पण तो २० धावांवर माघारी परतला. नेदरलँड्स संघाचा डाव १०३ धावांवर आटोपला.


या सामन्यातील पहिल्या डावात अमेरिकेच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तर दुसऱ्या डावात गोलंदाजांनी नेदरलँड्सच्या फलंदाजांवर दबाव टाकला. नेदरलँड्सकडून हरमित सिंगने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर मोहम्मद मोहसीनने २ आणि शाल्क्विकचा शेडलीने ३ गडी बाद केले. अमेरिकेच्या फिरकी गोलंदाजांनी शेवटपर्यंत नेदरलँड्सच्या फलंदाजांवद दबाव बनवून ठेवला. परिणामी नेदरलँड्सचा डाव अवघ्या १०३ धावांवर आटोपला. हा अमेरिकेचा या स्पर्धेतील पहिलाच विजय ठरला आहे.

Comments
Add Comment

Cristiano & Georgina : फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि जॉर्जियाना रॉड्रिगेझ अडकणार लग्नबेडीत; मादेरा येथे रंगणार सोहळा

फुटबॉल जगतातील लोकप्रिय तारा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि त्याची पार्टनर, मॉडेल जॉर्जियाना रॉड्रिगेझ यांच्या

IND vs SLA Test Series Sai Sudharsan : साई सुदर्शन सराव सामन्याला मुकणार, पण...; पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिलासा

India vs Sri Lanka Test Series : भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वी युवा फलंदाज साई सुदर्शन (Sai Sudharsan) याच्या दुखापतीमुळे चाहत्यांची

Rohit Sharma Selection Controversy : रोहित शर्माच्या निवडीवरून BCCI विरुद्ध निवड समिती? आगरकर कोंडीत; पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे?

मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा वरिष्ठ खेळाडूंच्या निवडीवरून चर्चांना उधाण आले आहे. रोहित शर्माच्या (Rohit

ICC ODI World Cup : आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : पुरुषांच्या आयसीसी वन डे वर्ल्ड कपच्या पात्रता फेरीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. स्पर्धा सुरू

Sunil Gavaskar on Ajinkya Rahane : 'अजिंक्य रहाणेला कधीच योग्य श्रेय मिळालं नाही'; रहाणेच्या निवृत्तीनंतर सुनील गावसकर भावुक, राहुल द्रविडशी केली तुलना

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील विश्वासार्ह फलंदाज आणि माजी कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने आंतरराष्ट्रीय

Brock Lesnar : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : WWE मधील स्टार खेळाडू ब्रॉक लेसनरने निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. समरस्लॅमच्या मुख्य