रिलायन्सला मिळाला व्हेनेझुएलातून तेल खरेदीचा परवाना

मुंबई : व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांचे अमेरिकेने लष्करी बळावर अपहरण केले. यानंतर अमेरिकेने व्हेनेझुएलातील तेलाच्या उत्खननासाठी सरकारी आणि खासगी कंपन्यांना परवाने देण्यास सुरुवात केली आहे. भारतातल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला व्हेनेझुएलातील तेलाच्या उत्खननासाठी परवाना मिळाला आहे. हा परवाना मिळाल्यामुळे भारतीय उद्योजक मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी व्हेनेझुएलात तेलाचे उत्खनन करू शकेल.


व्हेनेझुएलाच्या तेलात सल्फरचे प्रमाण जास्त आहे. या तेलाचे शुद्धीकरण करण्याचे तंत्रकौशल्य रिलायन्सच्या रिफायनरीकडे आहे. यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला परवाना मिळवणे सोपे झाले. अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाच्या रिफायनरी व्हेनेझुएलाच्या तेलाचे शुद्धीकरण करण्यासाठी सर्वाधिक सक्षम आहेत. यामुळे व्हेनेझुएलाचे स्वस्त तेल शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात भारतात येण्याची शक्यता आहे. शुद्धीरणानंतर हे तेल भारतात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी जाईल. यामुळे भारतातील इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता आहे.


व्हेनेझुएलातून भारतापर्यंत कच्च्या तेलाचा पुरवठा विना अडथळा सुरू ठेवण्यासाठी नियोजन सुरू आहे. एप्रिल २०२६ पासून व्हेनेझुएलाचे तेल मोठ्या प्रमाणात शुद्धीरणासाठी भारतात येणार आहे. सूत्रांच्या मते व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलामुळे रिलायन्सला मोठा आर्थिक फायदा अपेक्षित आहे.

Comments
Add Comment

अशोक खरात प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील भोंदूबाबा अशोक खरात याला बलात्कार, महिलांशी गैरवर्तन, महिलांची फसवणूक अशा गंभीर

कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार

बंगळुरू : कर्नाटकमध्ये प्रत्येक आमदाराला आयपीएलच्या राज्यातील शुभारंभाच्या सामन्याचे VIP पास मिळणार आहेत.

चार सहायक आयुक्तांच्या बदल्या, गजानन बेल्लाळे यांची घाटकोपर मधून बदली, कुलाबा,नरिमन पॉइंटची जबाबदारी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्तांची खांदे पालट करण्यात आली असून मुंबईच्या महापौर

लडाखमध्ये हिमस्खलन, सात जणांचा मृत्यू; श्रीनगर-लेह महामार्ग बंद

लडाख : लडाखमधील झोजी ला येथे श्रीनगर-लेह महामार्गावर झालेल्या हिमस्खलनात अनेक वाहने बर्फाखाली गाडली गेली.

मुंबई महानगर क्षेत्रात २०२५ मध्ये १.३३ लाख कोटी रुपयांची घरविक्री

मुंबई : भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात मुंबई महानगर क्षेत्राने अर्थात MMR ने २०२५ या वर्षात ऐतिहासिक कामगिरी

ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता प्रकल्पाच्या मुख्य कामाला सुरुवात

मुंबई : देशातील सर्वात जटिल नागरी रस्ता बोगदा प्रकल्पांपैकी एक असलेल्या ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा रस्ता